वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कंपनीच्या भिंती, शेड, सुरू असलेल्या यात्रेचे दुकाने, झुले आदींचे मोठे नुकसान झाले आहे.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
काही दिवसा आगोदर जणू सूर्य आग ओकत असल्याचा भास जनसामान्यांना होत होता,
दुपारचा उकाळा पाहून रस्त्यावरील रेलचेल कमी झाली होती.
दि. 18 ला सायंकाळच्या दरम्यान अचानक वादळी वारा सुरू झाला अन् वणी सह परिसरात वादळी
वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान पावसाने सर्वसामान्यांना चांगलाच फटका दिला.
यात काहींच्या घरचे टीन पत्रे, शहर व परिसरातील झाडे पडली, वॉटर टँक उडाल्या, बॅनर फाटले,
तर भालर येथील रॉकवेल मिनरल व हारमोनी कंपनीच्या भिंती पडून परिसरात व मशनरीत पाणी शिरल्याने कंपनीला मोठे
नुकसान झाले यात त्यांचे अंदाजे दिड करोडाचे नुकसान झाल्याचे हुसैन बादशाह यांनी सांगितले.
तसेच श्री रंगनाथ स्वामी यात्रा सुरू असून याचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
दुकानांचे छप्पर उडाले काहींचे संपूर्ण दुकाने पडली असुन, झुल्या चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
त्यांचे अं. सात लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या अवकाळी पावसाचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसला असुन ज्यांचे
शेतमाल निघायचा होता त्यांच्या शेत मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकरी सुधा हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला
असून परिसर थंड झाल्याने तर काही ठिकाणी शिरवा पाऊस झाल्याने
थंडीच्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/daheigav-case-prohibited-telhara-city-closed-market/