दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प

दहीगाव प्रकरणाचा निषेध;

अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहीगाव येथील घटनेत हिंदू समाज बांधवांवर

खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होतेय.

त्यानुसार आज तेल्हारा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती.

Related News

16 एप्रिलला दहीगाव फाट्यावरील कमानवरील निळे झेंडे काढून त्याचा अवमान करून धार्मिक भावना

दुखावल्याबद्दल दहीगाव येथील काही युवकांवर तेल्हारा पोलिस स्टेशन येथे दहीगाव येथील

काही नागरिकांच्यावतीने चुकीच्या पद्धतीने तक्रार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

तर तेल्हारा पोलिस स्टेशनने सखोल चौकशी न करता घाईगडबडीने खोटे गुन्हे दाखल

केल्याचा आरोपही करण्यात आला. सदर गुन्हे मागे घेण्यात यावे, या निषेधार्थ आज तेल्हारा

शहर बंदचे आवाहन समस्त हिंदू संघटना, हिंदू समाज व व्यापारी व्यावसायिक वर्ग यांच्यावतीने स्वयंस्फूर्तीने करण्यात आले होते.

त्यानुसार आज तेल्हारा शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

 

Read Also : https://ajinkyabharat.com/aligadhmadhil-hotelmadhye-devatanchaya-chitrasah-napkin-dilayane-gondha/

Related News