मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच धुराचे लोळ संपूर्ण बसभोवती पसरले.
चर्चगेट स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ जवळ ही बस थांबलेली असताना अचानक तिला आग लागली.
बस जे. मेहता मार्गाच्या दिशेने जाणारी होती.
आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
लोकांनी तातडीने बसमधून बाहेर पडत जीव वाचवला.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. आग कशामुळे
लागली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून चर्चगेट स्थानकातील फास्ट लोकल गाड्यांना
काही काळ प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर वळवण्यात आले होते.
त्यामुळे प्रवाशांना थोड्याफार गैरसोयीचा सामना करावा लागला.
या घटनेची चौकशी सुरू असून बेस्ट प्रशासनाने बसची तपासणी व मेंटेनन्स रिपोर्ट मागवले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/gulzarpura-smashanbhumi-mojte-akherchaya-ghatka/