मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा अखेर सुरू झाली असून,
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
यामुळे विदर्भातून मुंबईकडे किंवा मुंबईहून विदर्भात येणाऱ्या प्रवाशांना एक
सुलभ, जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
आज झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
अजित पवार, केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू, मुरलीधर मोहोळ,
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि खासदार नवनीत राणा आदी मान्यवर उपस्थित होते.
विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
-
सेवा चालू दिवस: सोमवार, बुधवार, शुक्रवार (आठवड्यातून तीन दिवस)
-
मुंबई ते अमरावती: दुपारी 2:30 वाजता प्रस्थान, 4:15 वाजता आगमन
-
अमरावती ते मुंबई: संध्याकाळी 4:40 वाजता प्रस्थान, 6:25 वाजता आगमन
-
सेवा संचालक: अलायन्स एअर
-
नाईट लँडिंगला परवानगी नाही – त्यामुळे केवळ दिवसा सेवा उपलब्ध
अमरावती विमानतळावर लँडिंग करणारे पहिले व्यावसायिक विमान:
आज उद्घाटनप्रसंगी “72 आसनी” अलायन्स एअरचे विमान अमरावती विमानतळावर यशस्वीरीत्या उतरले.
यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही इथे सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भविष्यातील योजना:
खासदार रवी राणा यांनी सांगितले की, “लवकरच अमरावतीहून दिल्ली
आणि पुण्यासाठीही विमानसेवा सुरू केली जाईल”, असे नियोजन सुरू आहे.
या सेवेमुळे अमरावती जिल्हा आणि संपूर्ण विदर्भासाठी नव्या विकासद्वारांचे दरवाजे उघडणार असून,
पर्यटन, व्यापार आणि शिक्षण क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-shaharat-comes-5-divasad-panipurwatha/