नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;

नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;

नाशिक (16 एप्रिल 2025) – नाशिक महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या

काठे गली सिग्नल परिसरातील सातपीर दर्गा हटविण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या महापालिका

आणि पोलिस पथकावर काल रात्री दगडफेक करण्यात आली.

Related News

या गोंधळादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाली असून,

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर केला.

या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून आज (16 एप्रिल) दिवसभर पोलिसांचा

कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काठे गली ते भाभानगर मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नाशिक महानगरपालिकेने 1 एप्रिल 2025 रोजी सातपीर दर्गा अनधिकृत असल्याचे

जाहीर करून 15 दिवसांत अतिक्रमण हटविण्याचे नोटीस दिले होते.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

रात्री उशिरा ही कारवाई सुरू होताच परिसरात तणाव निर्माण झाला आणि काही लोकांनी अचानक दगडफेक सुरू केली.

या दगडफेकीत:

  • 2 सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) आणि

  • 20 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले.

  • एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून,

  • 5 गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • 8 पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या पार्श्वभूमीवर काही मौलवींच्या मध्यस्थीने कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, काही गटांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने

परिसरात तणावपूर्ण वातावरण असून, महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन सतर्क आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akotfel-complex-lutmar-karanya-shetty-tolicha-exposed-four-sarait-accused-polisancha/

Related News