अकोला (14 एप्रिल 2025)
अकोल्यातील अकोटफैल पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांना आणि रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक
दाखवून लुटणाऱ्या ‘शेट्टी टोळी’चा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
या कारवाईत चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून लुटीची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी हेमंत मिश्रा हे आपटापा चौकातून दुचाकीने घरी जात असताना हनुमान मंदिर,
लाडीसफैल येथे संतोष उर्फ शेट्टी, ऋषीकेश बेले, रोशन त्रिपाठी आणि सुजल उर्फ कलर या चौघांनी त्यांना अडवले.
या आरोपींनी मिश्रा यांच्याकडे दारू पिण्याकरिता पाच हजार रुपयांची मागणी केली.
पैसे नाकारल्यावर संतोष शेट्टी आणि इतरांनी चाकू दाखवून त्यांना
शिवीगाळ केली व खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले.
त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोटफैल पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत कारवाई केली.
या प्रकरणात खालील आरोपींना अटक करण्यात आली:
-
संतोष उर्फ शेट्टी पुरषोत्तम एंगळ
-
ऋषीकेश अंबादास बेले
-
रोशन आशितोष त्रिपाठी
-
सुजल उर्फ कलर गणेश रात
या टोळीविरोधात यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, अधिक तपास सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/meghatat-tourist/