वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमे! भांडुपच्या गुंडाची ‘गुन्हेगारी थाटात’ पार्टी,

वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमे! भांडुपच्या गुंडाची ‘गुन्हेगारी थाटात’ पार्टी,

मुंबई प्रतिनिधी |

मुंबईतील भांडुप परिसरातील झिया अन्सारी या कुख्यात गुंडाने आपल्या वाढदिवसाचा अनोख्या

पद्धतीने जल्लोष साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Related News

अलीकडेच जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या अन्सारीने आपल्या

गुन्ह्यांची कलमे लिहिलेल्या केकची सजावट करून वाढदिवस साजरा केला.

विशेष म्हणजे या केकवर पुढचा गुन्हा, पुढचं कलम कोणतं?” असा सवालही लिहिण्यात आला होता.

या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये अन्सारीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होत असल्याचे दिसते.

त्याच्या समर्थकांनी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत गुन्ह्यांशी संबंधित रील्स आणि पोस्ट शेअर केल्या.

त्यामुळे तरुणाईला गुन्हेगारीकडे आकर्षित करण्याचा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत भांडुप पोलीस ठाण्याने अन्सारीविरोधात चौकशी सुरू केली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीला तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे.

अन्सारीवर आधीपासूनच मारहाण, खंडणी, धमकी आणि गुन्हेगारी टोळी स्थापनेसारखे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/bordi-niverd-kordethk-saha-gavanti-siti-siti-patur-talavatun-pani-sodanyachi-magani/

Related News