मुर्तीजापुर | अधर खान
शासनाच्या निद्रिस्त अवस्थेला धक्का देण्यासाठी, आणि शेतकरी व दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार
जनशक्ती पक्षाने ११ एप्रिलच्या रात्री मुर्तीजापुर येथे जोरदार मशाल मोर्चा काढत सरकारला थेट इशारा दिला —
Related News
अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी प्रकरणावर 'रामायण' फेम सुनील लहरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात झाल्य...
Continue reading
WhatsApp चे 7 मोठे बदल! मोबाईल नंबरशिवाय चॅटिंगसाठी Username फीचरची सुरुवात
जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या वा...
Continue reading
जो पाणी अडवेल त्याचे हात कापू; सिंधू जल करारावरून पाकिस्तानच्या मंत्र्यांची संतप्त धमकी, भारताच्या भूमिकेनंतर नवा वाद
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील
Continue reading
8वा वेतन आयोग: 2.57 फिटमेंट फॅक्टरचा धक्का? किमान ₹69,000 पगाराचे स्वप्न धोक्यात, जाणून घ्या संपूर्ण गणित
आठव्या वेतन आयोगात 2.57 किंवा 2.86 फिट...
Continue reading
43-इंचाचा Google TV गुपचूप ऑर्डर! 'मला कार्टून पाहायचं होतं' म्हणत चिमुकल्याचा भन्नाट प्रताप; VIDEO तुफान VIRAL
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांचा स्मार्ट...
Continue reading
समय रैनाच्या जुन्या व्हिडिओवर टीका करताच खासदार प्रियांका चतुर्वेदी सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. Gen Z युजर्सच्या प्रतिक्रिया, संजय राऊतांचा संदर्भ आणि...
Continue reading
6 खास फोटोंमध्ये पाहा! खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सुनबाई वैष्णवी महाडिक यांचा मनमोहक वाढदिवसाचा रॉयल लूककोल्हापूर : खासदार धनंजय महाड...
Continue reading
व्हेनेझुएला: नैसर्गिक आपत्ती एका क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून टाकते, याचा अत्यंत वेदनादायी अनुभव व्हेनेझुएलामधील महाभयंकर भूकंपानंतर समोर आला आहे. 2...
Continue reading
पुतिन यांची स्पष्ट कबुली चर्चेत : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता जवळपास चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. या काळात दोन्ही देशांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले...
Continue reading
अकोला शहरातील मोर्णा नदीतील वाढलेल्या जलपर्णीच्या समस्येविरोधात संभाजी ब्रिगेड महानगरच्या वतीने लोखंडी पूल परिसरातील नदीपात्रात उतरून आंदोलन करण...
Continue reading
TET Paper Leak 2026: 6 लाख उमेदवारांना मोठा धक्का! दीड कोटींचा पेपरफुटी रॅकेट उघड, भिवंडीत 3 उच्चशिक्षित आरोपी अटकेत
देशभरात 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराचे प...
Continue reading
FIFA World Cup मधील रोनाल्डो, मेस्सी, नेमार, एम्बापे, यमाल आणि इतर स्टार फुटबॉलपटूंची भन्नाट मराठी नावं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. पाहा 9 ...
Continue reading
“जर सरकार बधत नसेल, तर प्रहारच्या मशालीचा उजेड थेट विधानसभेत पोहोचेल!”
मुर्तीजापुर-बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश ‘अप्पा’ पिंपळे यांच्या जनसंपर्क
कार्यालयावर रात्री साडेअकराच्या सुमारास आक्रमक मोर्चा दाखल झाला. हातात पेटलेल्या मशाली,
निळे दुपट्टे, आणि “शेतकऱ्यांचा जयजयकार – सरकारला धक्का देणार!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रहारची ठाम मागणी:
प्रहार तालुका अध्यक्ष अक्षय अनिल वैराळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी
पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च मनरेगामधून द्यावा
दिव्यांग बांधवांना दरमहा ₹६००० मानधन मंजूर करावे
‘हे सरकार झोपले आहे!’ – प्रहारचा सवाल
“दररोज सात शेतकरी आत्महत्या करतात आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्याला अजूनही झापडं लागली आहेत!
निवडणुकीआधी ‘शेतकऱ्यांचे पुत्र’ म्हणून मिरवणारे आज गप्प का?” असा थेट सवाल प्रहारने उपस्थित केला.
यावेळी अक्षयभाऊ वैराळे, नारायणभाऊ लोखंडे, संदीप चव्हात, प्रल्हाद मालळकर, पुडलिंग धंदरे,
तुषार लोखंडे, रामेश्वर खुळे, पंकज आंधळे, विठ्ठल घुगे, रणजीत लोखंडे यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कडेकोट बंदोबस्तात आंदोलन
मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणेदार अजित जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश सूर्यवंशी, आशिष शिंदे आणि पवार साहेब यांनी भक्कम पोलीस बंदोबस्त ठेवला.
महात्मा फुले व आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र
प्रहारने स्पष्ट केलं की ही लढाई “शेतकऱ्याच्या जिवाची आणि दिव्यांगाच्या हक्काची” असून येत्या
महात्मा फुले जयंती (११ एप्रिल) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) या काळात आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल.
“हातात मशाल, ओठांवर घोषणा आणि मनात अन्यायाविरुद्धची चीड – प्रहारचं हे आंदोलन सरकारला झोपेतून जागं करणार!”
Read Also :