वृत्तसेवा – अतुल नवघरे
लाखपुरी (ता. १० एप्रिल) : मुर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणाऱ्या लाखपुरीसह इतर गावांमध्ये
सतत लाईन चालू-बंद होत असल्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.
Related News
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
दिवस आणि रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या विजेच्या अडचणीमुळे फ्रिज, टीव्ही, कॉम्प्युटर, पंखे यासारख्या विद्युत उपकरणांचे नुकसान
होण्याची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.
नागरिकांचे म्हणणे –
-
“लाखपुरी सह इतर गावांमध्ये लाईन बंद राहत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने याकडे लक्ष द्यावे.”
– सौ. मीनल नवघरे (माजी पं.स. सदस्या, लाखपुरी) -
“सतत लाईन जात असल्यामुळे घरातील उपकरणांची हानी होऊ शकते. महावितरण विभागाने त्वरीत पावले उचलावीत.”
– अॅड. दत्तराज देशमुख (लाखपुरी) -
“या समस्येमुळे गावातील जनतेला नाहक त्रास होत आहे. तीव्र निषेध करतो.”
– पुरुषोत्तम डागा (लाखपुरी)
महावितरणचे स्पष्टीकरण –
याबाबत ज्युनिअर इंजिनिअर अनिकेत भोंदाणे म्हणाले की, “हवामानाच्या बदलामुळे कधी कधी ट्रिपिंग होते.
मात्र आठ दिवसांत ही समस्या सोडवली जाईल.”
नागरिकांची मागणी आहे की दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील लाईन
समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा व महावितरण विभागाने तातडीने याकडे लक्ष द्यावे.