नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड

अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड

अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):

नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल

यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर पुन्हा एकदा सभासदांनी विश्वास दाखवला आहे.

Related News

या वेळी उपाध्यक्षपदी शोएब अहमद खान, तर सचिवपदी मधुसूदन व्यवहारे यांची देखील अविरोध निवड झाली.

संपूर्ण कार्यकारिणी निवड अविरोध झाल्यामुळे संस्थेच्या एकात्मतेचे आणि सहकार्याच्या वातावरणाचे उदाहरण पुन्हा अधोरेखित झाले.

निवडीनंतर अध्यक्ष तसलीम पटेल यांनी सभासदांचे आभार मानत, संस्थेच्या आर्थिक

सक्षमीकरणासाठी आणि शिक्षकांच्या हितासाठी पारदर्शक व बांधिलकीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या निवडीनंतर शिक्षक संघ, सहकारी संस्था व स्थानिक नागरिकांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related News