सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावातील ग्रामपंचायत सदस्य व महिला ग्रामसभा बचत गट यांनी दि.२७ जाने.२०२५ ला जिल्हापरिषदेचे
मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते व २८ फेब्रु.२०२५ कळंबा बोडखे येथील ग्रामपंचायत
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
अधिकारी यांना निवेदन दिले.परंतू अद्यापही गावातील महिलांना पाणी मिळाले नाही.त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा
परिषद वाशिम व कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वाशिम यांनी ३० ते ४०दिवसात आपणास संपूर्ण
गावाला पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.त्याबाबीचा विसर या वरिष्ठांना पडल्याचे निवेदनकर्तेचे म्हणणे आहे.
या दिलेल्या निवेदनातून स्पष्ट होते.जलजीवन मिशन योजनेतंर्गत उपविभाग मंगरुळपीर यांच्या मार्गदर्शनात हि योजना राबविण्यात आली.
परंतू हि योजना अंदाजपत्रकानुसार योजना राबविण्यात न आल्यानेच गावातील लोकांना अद्यापही पिण्याचे पाणी मिळत नाही.
हि बाब पाणीपुरवठा विभागासाठी शोकांतिका असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले शब्द हवेतच विरले आहेत.त्यामुळेच नाईलाजास्तव दि.८एप्रील २०२५
रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना कळंबा बोडखे गावाला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होण्यासाठी निवेदन दिले
त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे.जर ७ दिवसाच्या आत पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर दि.२१एप्रिल रोजी अकोला
नाका स्त्रीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या
कार्यालयावर हंडा डोक्यावर घेऊन धडक मोर्चा काढला जाईल व यादरम्यान कोणताही
अनुचित प्रकार घडला तर सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल असेही निवेदनात म्हटले आहे.
याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम यांनाही कळवण्यात आले आहे.
मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर ,शुद्ध जल या संकल्पनेला हारताळ फासल्या गेली.
हे मात्र यावरुन स्पष्ट दिसते.