भक्तिमय वातावरणात संत श्री सिदाजी महाराज यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

भक्तिमय वातावरणात संत श्री सिदाजी महाराज यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

नगर प्रदक्षिणा, दहीहंडी व महाप्रसादाने पातूर नगरी झाली भक्तिरसात न्हालेली

पातूर (प्रतिनिधी)

पातूर शहरातील संत श्री सिदाजी महाराज यांचा वार्षिक यात्रा महोत्सव यंदाही पारंपरिक उत्साह,

भक्तिभाव आणि हजारो भाविकांच्या सहभागाने उत्स्फूर्तपणे पार पडला.

Related News

पालखी सोहळा, नगर प्रदक्षिणा, दहीहंडी आणि महाप्रसाद अशा विविध उपक्रमांनी पातूर नगरी भक्तिरसात रंगून गेली.

टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा

सकाळी संत श्री सिदाजी महाराज यांच्या पवित्र पालखीने टाळ मृदंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा केली.

पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले भाविक आणि वारकऱ्यांच्या कीर्तन-भजनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या पालखीला हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

आबालवृद्धांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवत पालखीचा मार्ग पुष्पवृष्टीने सजवला.

दहीहंडीने वातावरणात उत्साहाचा स्फोट

दुपारी ठिक १२ वाजता आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाने यात्रेतील उत्साह शिगेला पोहोचवला.

युवकांच्या टिमांनी मोठ्या हर्षोल्हासात दहीहंडी फोडली. टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

महाप्रसादासाठी भाविकांची गर्दी

सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचवटी परिसरातील आणि तालुकाभरातील

नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.

स्वयंपाक व वितरण व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे भाविकांना कुठलीही अडचण झाली नाही.

पोलीस आणि स्वयंसेवकांचे उत्तम व्यवस्थापन

यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

तसेच, अनेक सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक यात्रेकरूंच्या सेवेसाठी कटिबद्ध होते.

वाहतूक व्यवस्थापन, पाण्याची सोय, मदत केंद्र यांची व्यवस्था सुयोग्य होती.

भाविकांनी अनुभवला भक्तिरसाचा जल्लोष

या यात्रा महोत्सवात सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी होऊन सामाजिक ऐक्य आणि श्रद्धेचे दर्शन घडवले.

यात्रा शांततेत व सुरळीत पार पडल्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण होते.

Related News