बोरगाव मंजू (प्रतिनिधी):
राष्ट्रीय महामार्गावर धावत असलेल्या टाटा सुमो वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना
८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.
Related News
आयुर्वेदिक उपाय: कोमट मिठाच्या पाण्यात पाय बुडवल्याने शरीर आणि मन ताजेतवाने होतात
आयुर्वेदिक पाय स्नान : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शरीर...
Continue reading
17 फेब्रुवारी 2026 रोजी भारतात भर दिवसा अंधार? सूर्यग्रहणाबाबत नेमकं सत्य काय?
2026 मधील पहिले सूर्यग्रहण
खगोलीय दृष्टिकोनातून पाहिलं तर 2026 हे वर्ष ग्रहणांच्या दृष्टीने महत्त्व...
Continue reading
मेझेसपासून बकलावापर्यंत: Hina Khan चा इस्तंबूलमधील खाद्यप्रवास म्हणजे निव्वळ स्वर्गसुख
लोकप्रिय अभिनेत्री Hina Khan ही केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर त...
Continue reading
‘द 50’ रिअॅलिटी शोमधील सर्वात मोठं गूढ: ‘द लायन’ आहे तरी कोण?
‘The Lion ’ कोण? ‘The 50 ’ रिअॅलिटी शोम...
Continue reading
Bigg Boss Marathi 6: “अंगावर चढू नकोस…”, बिग बॉसच्या घरात ठिणग्या पेटल्या; दिपाली आणि रुचितामध्ये जोरदार राडा
कलर्स मराठीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो
Continue reading
माजी लिबियन हुकूमशहाचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफी ठार झाल्याचा दावा
लिबियाच्या राजकारणात खळबळ, मृत्यूबाबत परस्परविरोधी माहिती
Continue reading
दिवसा होणार काळाकुट्ट अंधार! 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाची उत्सुकता शिगेला, कालावधी आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
2026 हे वर्ष खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत...
Continue reading
EPFO Pension Rules : 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार? जाणून घ्या सविस्तर गणित
EPFO पेन्शनवर मोठा दिल...
Continue reading
Budget 2026 : आठवा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणार की नाही? अर्थसंकल्पातून काय मिळाले संकेत?
केंद्र सरक...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला गती; छगन भुजबळांचे विधान चर्चेत
महाराष्ट्रातील राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर ...
Continue reading
घड्याळात ‘11.11’ वाजले की खऱ्या मनापासून इच्छा मागा, परंतु हे खरंच पूर्ण होते का?
आपल्या दैनंदिन आयुष्यात असे अनेक छोटे-छोटे संकेत येतात जे आपल्याला अचंबित करतात. त्यापैकी एक लोकप...
Continue reading
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, बडनेरा येथून अकोल्याच्या दिशेने निघालेल्या टाटा सुमो (MH-27-AC-3738) वाहनात तीन महिला,
एक चिमुकला, चालक व इतर प्रवासी अशा एकूण नऊ जणांचा प्रवास सुरू होता.
दरम्यान गाडी बोरगाव मंजू जवळ आली असताना चालकाच्या लक्षात गाडीमधून धूर निघत असल्याचे आले.
त्याने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली व सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
गाडी झाली भस्मसात, प्रवाशांची सुटका
प्रवाशांना बाहेर काढताच काही क्षणांतच गाडीने अचानक पेट घेतला व संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
काही क्षण उशीर झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.
प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकत “दैव बलवत्तर म्हणून वाचलो,” अशी प्रतिक्रिया दिली.
घटनास्थळी एकच झुंबड
आगीचे दृश्य पाहण्यासाठी महामार्गावर बघ्यांची गर्दी जमली होती.
दरम्यान, पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य हाती घेतले.
या घटनेचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.