अकोल्यात अल्पवयीन मुलीवर दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार

रेल्वे स्टेशन चौक परिसरातील धक्कादायक घटना; आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू**

अकोला | प्रतिनिधी : गणेश सुरेश नावकार, सहा. पो.नि.

अकोला शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरात आपल्या मैत्रिणीसोबत उभ्या असलेल्या

Related News

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून पळवून नेत अकोटफैल भागात तिच्यावर अमानुष

अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकारानंतर शहरात खळबळ उडाली

असून रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

खामगाववरून अकोल्यात आलेली होती मुलगी

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी अकोल्यात आली होती.

रात्री उशिरा ती रेल्वे स्टेशन चौकात दुसऱ्या अल्पवयीन मैत्रिणीसोबत थांबली होती.

त्याचवेळी एका २५ वर्षीय अनोळखी तरुणाने दुचाकीवरून येत तिला जबरदस्तीने सोबत नेले.

अत्याचार करून पुन्हा सोडले

सदर संशयित तरुणाने तिला शहरातील अकोटफैल परिसरात नेत तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर

तिला पुन्हा रेल्वे स्टेशन चौकात आणून सोडले. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड धक्क्यात होती.

रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार

पीडित मुलीने नातेवाइकांच्या मदतीने रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान व बाल

संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

आरोपीचा शोध सुरू

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवले असून आरोपीच्या ओळखी व अटकेसाठी

विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत

असून लवकरच आरोपीला अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related News