अकोट (प्रतिनिधी) –
“सहकारातून समृद्धी” ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना देशातील सहकारी चळवळीला
गतिमान करण्यासाठी असून तळागाळातील लोकांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्रगती घडवून
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
आणण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर यांनी व्यक्त केला.
अकोला व वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त अकोट कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पगारदार कर्मचारी सहकारी
पतसंस्था व बिगरशेती संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना हिंगणकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या संचालिका श्रीमती भारतीताई गावंडे होत्या.
यावेळी आकोट खविसचे अध्यक्ष हिदायत पटेल, बँकेचे संचालक डॉ. जसराज कोरपे,
सहा. निबंधक श्रीमती रोहिणी विटणकर, कृउबास सभापती प्रशांत पाचडे, सहकारी जिनिंगचे
अध्यक्ष सुभाष वानखेडे, खविस उपाध्यक्ष शेषराव पाटील, कृउबास उपसभापती अतुल खोटरे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक बी.जे. काळे आणि चार्टर्ड अकाउंटंट सुवर्णा मंगळे यांनी
‘सहकारातून समृद्धी’ योजनेच्या उद्देशांवर, कार्यपद्धतीवर आणि उपक्रमांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी,
संचालक आणि सहकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
डॉ. जसराज कोरपे यांचा सत्कार
या वेळी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नव्याने निवडून आलेले
संचालक डॉ. जसराज संतोष कोरपे यांचा तालुक्यातील सहकारी संस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ठाकरे, प्रास्ताविक शाखाधिकारी आशिष घोम,
तर आभार प्रदर्शन आशिष ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजनासाठी
प्रशांत उकंडे, गजेंद्र शिंदे, उमेश मोरे आणि मंगेश काळे यांनी विशेष मेहनत घेतली.