अकोट (प्रतिनिधी विशाल आग्रे): तालुक्यातील सावरा गावात अरुण शालीग्राम सपकाळ यांच्या
घराला 2 एप्रिलच्या मध्यरात्री अचानक भीषण आग लागली.
रात्री 1 वाजता लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले असून,
Related News
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत एक बैल आणि एक गाईचा होरपळून मृत्यू झाला.
आग लागल्याचे लक्षात येताच अरुण सपकाळ यांनी गावात आरडाओरड करून नागरिकांना जागे केले.
गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती नियंत्रणात आणता आली नाही.
अखेर अकोट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
या आगीत घरातील भांडी, कपडे, धान्य (गहू, ज्वारी, तूर डाळ), दरवाजे,
बांबू आणि कवेलू पूर्णतः जळून खाक झाले. प्रशासनाने घटनेची पाहणी करून पंचनामा केला असून,
एकूण ₹2,75,000 चे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अरुण सपकाळ यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.