अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील
शेरवाडी गावातील ३२ वर्षीय युवा शेतकरी विवेक बाबाराव ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
गेल्या महिन्यात जिल्ह्यात सहा, तर फक्त मूर्तिजापूर मतदारसंघातच चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्य
विवेक ढाकरे हे वडिलोपार्जित ११ एकर शेती कसत होते. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते,
त्यामुळे संपूर्ण शेती व घराची जबाबदारी त्यांच्यावरच होती. आईसोबत राहत असलेल्या विवेक यांना शेतीच्या
खर्चासाठी घेतलेल्या कर्जाचा मोठा भार होता. सततच्या नापिकी, वाढती महागाई,
आणि पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक तंगीने त्रस्त
असलेल्या विवेक यांनी शेवटी टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्येचा प्रयत्न आणि मृत्यू
२६ मार्च रोजी नैराश्यातून त्यांनी घरातच कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी
तातडीने त्यांना मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अकोला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबावर संकट – आता आईचे काय?
विवेक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या तीन बहिणींचे लग्न झाले असून,
कुटुंबात कमावणारा दुसरा कोणीच नाही. एका कर्त्या युवकाच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली असून,
शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकरी आत्महत्यांवर उपाययोजना आवश्यक
अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. कर्जमाफी,
शेतीला हमीभाव आणि पीकविमा यांसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेऊन ठोस निर्णय घेतले नाहीत,
तर असे दुर्दैवी प्रसंग वारंवार घडत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.