लाखपुरी येथे रमजान ईद उत्साहात साजरी

लाखपुरीत रमजान ईद उत्साहात साजरी – सर्वधर्म समभावाचा संदेश

सर्वधर्म समभावाचा संदेश; हिंदू-मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा

लाखपुरी (ता. मूर्तिजापूर): लाखपुरी येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि बंधुतेच्या

वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गुलाब देऊन शुभेच्छा

Related News

दिल्या आणि ईदगाहवर विशेष स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

लक्षेक्ष्वर संस्थान सेवाधारी, गुरुदेव सेवा मंडळ, गजानन महाराज संस्थान, सिद्धार्थ मंडळ आणि ग्रामपंचायत

पदाधिकाऱ्यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बांधवांनी मुस्लिम समाजाचे स्वागत केले.

ईदनिमित्त थंड पाणी, नाश्ता आणि फराळ वाटप करण्यात आले.

“सर्व जाती-धर्मांनी एकत्र सण साजरे करावेत” – मुफस्सीर अली

कार्यक्रमाचे संचालन मुफस्सीर अली यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,

“हिंदू बांधवांनी आमच्यासाठी शुभेच्छा कार्यक्रम आयोजित केला, त्याचप्रमाणे आपण सर्वजण कोणत्याही

जाती-धर्माचा सण एकत्र साजरा करूया, जेणेकरून लाखपुरीत सर्वधर्म समभाव टिकून राहील.”

पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

ईदचा सण शांततेत पार पडावा म्हणून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुठे,

उपनिरीक्षक चंदन वानखडे आणि लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राजू दहापुते यांनी आभार व्यक्त केले.

गावातील विविध समाजाचे मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News