खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) वारसदार होणार का अशी चर्चा रंगली आहे.
भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो
Related News
Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेबाबत मोठा खुलासा; 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये, RTI मधून धक्कादायक माहिती
महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाच...
Continue reading
शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार आक्रमक; राष्ट्रवादीत बैठकांचा धडाका, नेमकं काय शिजतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासू...
Continue reading
Khavdya Dongar : ‘तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी मंगळसूत्र काढून फेकते…’; खवड्या डोंगरावर मृत्यूआधी नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राला हादरवून सोडण...
Continue reading
100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती? 2027 मध्ये अल निनोचा कहर; भारतात उष्णता आणि मान्सूनचं मोठं संकट
जगभरातील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आता अल निनोबाबत चिंताजनक अंदाज समोर येत आह...
Continue reading
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल? जाणून घ्या 22 ऑगस्टचे ताजे दर
पेट्रोल आणि डिझेलच्या दराकडे सर्वसामान्यांचे नेहमीच लक्ष असते. इंधनाच...
Continue reading
शिवसेना पक्षाचं चिन्ह अन् नाव कोणाचं? राहुल नार्वेकरांचा मोठा दावा; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना पक्षाचं...
Continue reading
महायुतीची मोठी खेळी; फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांचे स्नेहभोजन
महाराष्ट्राच्या राजकारणातून महायुतीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगाम...
Continue reading
संजय राऊत : राहुल गांधी या देशाचा नेता आहे, हे सांगणारा मी पहिला माणूस; ‘छात्रो की गुंज’आधी भाजपवर जोरदार निशाणा
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते
Continue reading
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर भाजपचा गंभीर आरोप; ‘ही छात्र की गुंज नाही, पैशांची गुंज’
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहु...
Continue reading
राम माधव ISIच्या निवृत्त अधिकाऱ्यांना भेटले? प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; चार मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रका...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! टॉयलेटजवळ भाजी, काळे पडलेले पनीर; हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई
राज्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशास...
Continue reading
RSS कॅम्पसमध्ये BMC शाळेतील विद्यार्थ्यांची सहल; 30 हजार विद्यार्थ्यांसाठी 2.46 कोटींचा खर्च
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीवरून नवा वाद निर्माण होण्...
Continue reading
असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.
“मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं दिसत आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते.
बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर येत नाही. पण काही संकेत स्पष्ट असतात.
संघ पुढील नेता ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल,”
असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तुमचं नाव घेतल्यासंबंधी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
“नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत.
अजून बरीच वर्षं नरेंद्र मोदी काम करणार आहेत. आमचा सर्वांचा आग्रह आहे.
आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत.
त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही”.
पुढे ते म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो.
ही मुघली संस्कृती आहे. तिथे वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचे विचार करतात.
सध्या कोणताही उत्तराधिकारी निवडण्याचा प्रश्न नाही”.
राज ठाकरेंच्या भाषणावर मांडली भूमिका
दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी भाषणात मांडलेल्या मुद्यांवरही भाष्य केलं.
राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
राज्य चालवताना सर्वांची मदत आणि विश्वासात घेऊन राज्य चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणे हे आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांन सांगितलं.
मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, 100 टक्के जे नियमाच्या बाहेर
असतील आणि सुप्रीम कोर्टांचा जो आदेश आहे या आदेशाचे तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल.
राज ठाकरेंनी औरगंजेबाच्या कबरीसंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर ते म्हणाले, “ही जी कबर आहे
तिला एएसआयचं संरक्षण आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो,
कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी त्या कबरीला संरक्षण दिलं आहे.
म्हणून त्या ठिकाणी कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे.
पण कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही”.