अकोट (दि. २७ मार्च २०२५): श्रीजी कॉलनी येथील सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये
ग्रॅज्युएशन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया, प्रमोद चांडक, लूणकरण डागा,
Related News
शारदा लखोटीया, सुधा डागा, दीपम लखोटीया, तसेच प्रमुख पाहुण्या सिंधु पवार,
शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, शिक्षिका रिंकू अग्रवाल,
तसेच अभिजीत मेंढे, सारिका रेळे आणि प्रभुदास नाथे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात
के.जी. १ च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली.
अर्चना रायबोले आणि योगेश चेडे यांनी विद्यार्थ्यांना साथ दिली.
ग्रॅज्युएशन डे हा विशेषतः के.जी. २ च्या विद्यार्थ्यांसाठी होता.
त्यांनी रंगारंग नृत्य सादर केले. त्यानंतर अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना डिग्री प्रदान करण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण
नर्सरी, के.जी. १ आणि के.जी. २ मधील विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आणि गीते सादर केली.
वर्षभर घेतलेल्या विविध उपक्रमांतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
सांस्कृतिक स्नेहसंमेलनात योगदान दिलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
इयत्ता २ रीच्या विद्यार्थिनींनी ‘चिअर्स गर्ल’ नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
के.जी. २ च्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या शालेय आठवणी शेअर केल्या.
प्रमुख पाहुण्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
प्रमुख पाहुण्या सिंधू पवार आणि शारदा लखोटीया यांनी कार्यक्रमाचे भव्य स्वरूप पाहून आनंद व्यक्त केला.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आणि शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक योगदानाची प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
संचालन विद्यार्थी ओवी वाळके, भावी वाघ, स्वरांश वाघ, अद्विका काटोले यांनी केले,
तर शिक्षिका भारती बघेले यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन कल्पना बिहाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युगंधरा मरोळकर, मीना वर्मा, वैशाली गावात्रे, निकिता महल्ले, शुभांगी वाकोडे,
रश्मी बेराड, सुनिता इंगळे, माधुरी हाडोले, दिपाली कुलट, सविता भोरखडे, शीला काळे, ममता सोनटक्के,
कांचन नहाटे, रचना सुपासे, भावना खेडकर, ज्योती रंधे, अश्विनी रुद्रकार, मुस्कान रामनानी,
संदेश चोंडेकर, रवी अंभोरे, सुदर्शन अंभोरे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
विद्यार्थ्यांचा सहभाग, पालकांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद आणि शाळेच्या
व्यवस्थापनाचे नियोजन यामुळे सेंट पॉल्स अकॅडमीचा ग्रॅज्युएशन डे संस्मरणीय ठरला.