Dhule News : अवघ्या दोन गुणांनी आर्मीत भरती होण्याची संधी हुकल्याने धुळ्यातील तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.
Dhule News : आर्मीत (Indian Army) भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या धुळे
(Dhule) तालुक्यातील रामी येथील उच्च शिक्षित तरुणाने अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्याने
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
आलेल्या नैराश्यातून आपल्याच शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अक्षय यशवंत माळी (21) (Akshay Mali) असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील रामी गावातील अक्षय माळी हा तरुण आर्मीमध्ये भरती होण्यासाठी झटत होता.
कुटूंबातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत तो बीएस्सीचे शिक्षण घेत असताना देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत होता.
मात्र दोन मार्कांनी त्याची संधी हुकल्याने तो निराश झाला होता.
शेतात दोरीच्या सहाय्याने घेतला गळफास
अक्षय माळी याने दि. 25 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास गावालगत मोडळ नदी
परिसरातील शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
डॉ. विद्या गायकवाड यांनी तपासणी करीत त्याला मृत घोषित केले.
याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,
पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी घेतली माळी कुटुंबियांची भेट
दरम्यान, अक्षय माळी याच्या आत्महत्येनंतर जिल्हा पोलीस
अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
अक्षय माळी याची आत्महत्या मला अस्वस्थ करून गेली आहे,
अशा भावना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केल्या.
अक्षयचे वडील यशवंत माळी हे शेतकरी आणि माळकरी असून, मुलाच्या दु:खाने ते कोसळले आहेत.
मुलाचा चेहरा सतत डोळ्यासमोर येतो, दोन दिवसांपासून झोप लागत नाही,
असे सांगताना त्यांचे हुंदके आवरत नव्हते. मी कधी त्याला शेतात कष्ट करायला पाठवले नाही.
हवे ते शिक, असेच नेहमी सांगत होतो. मात्र, आज त्यालाच खांद्यावर उचलावे लागले,
या शब्दांत त्यांनी हुंदके देत आपल्या भावना एसपी धिवरे यांच्याकडे व्यक्त केल्या.
या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.