Oral Cancer : मौखिक कर्करुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तंबाखू सेवन
करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तोंडाच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे.
सातारा : आपल्या देशात तोंडाच्या कॅन्सरच्या (Oral Cancer) रुग्णांची संख्या
Related News
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखू व तंबाखुजन्य (Tobacco) पदार्थांचे वाढते सेवन.
आपल्या देश तंबाखूचा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक आहे. यामुळे मौखिक कर्करुग्णांचे (Cancer) प्रमाणही
दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तंबाखू, गुटखा, सिगारेट,
किंवा खैनी सेवन करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तोंडाच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे.
मौखिक कर्करोगाची लक्षणे कशी ओळखाल?
मौखिक कर्करोगाची (ओरल कॅन्सर) सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी
तुमच्या तोंडांत चार बोट घातली तर ते व्यवस्थित उघडत आहे का, हे तपासा.
तसे होत नसेल तर वेळ न दवडता डॉक्टरांशी संपर्क साधा.
मौखिक कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपानाची वाईट सवय सोडणे आवश्यक आहे.
मौखिक स्वच्छतेची काळजी घेणे, तोंड आणि जीभ नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे.
तोंडाच्या आत काही बदल दिसल्यास किंवा अन्न गिळताना त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मौखिक स्वच्छतेसाठी हे करा उपाय
डॉ. विजय सुतार (वैद्यकिय प्रशासक, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा) सांगतात की,
तोंडात पांढरे-लालसर पुरळ किंवा फोड, तोंड उघडण्यात अडचण, जीभ बाहेर काढतांना त्रास,
आवाजात झालेला बदल यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या.
तोंडाची स्वच्छता आणि दातांची काळजी नियमितपणे घेतली नाही तर हिरड्यांना सूज,
जळजळ आणि इतर संसर्ग होऊ शकतात. या दीर्घकालीन संसर्गामुळे त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान होऊन कर्करोग होऊ शकतो.
मौखिक स्वच्छतेसाठी दिवसातून दोन वेळा दात घासणं, फ्लॉसिंग करणं, टूथब्रश वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे.
चांगल्या मौखिक आरोग्यासाठी सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे आहे.
त्याचबरोबर नियमित व्यायाम करणे तसेच ॲन्टीऑक्सिडंट, प्रोटीन, फायबरर्सचा समावेश असलेला पुरक आहार घेणे गरजेचे आहे.
तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे वेळीच ओळखल्यास व वेळीच निदान झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते.
यासाठी तुमच्या तोंडात होणाऱ्या बदलनाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
ठराविक कालावधीनंतर तोंडाची व दातांची तपासणी करत राहायला हवी असेही डॉ सुतार यांनी स्पष्ट केले.