शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा झटका देणाऱ्या स्नेहल जगताप
यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
रायगड : विधानसभा निवडणुकीतील शिवसेना युबीटी पक्षाच्या उमेदवार आणि महाडच्या माजी
Related News
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप (Snehal jagtap) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर
रायगड जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आक्रमक झाल्याचं पहावयास मिळत आहे.
ठाकरेंच्या शिवसैनिकांनी माणगाव येथे आयोजित केलेल्या बैठकीत स्नेहल
जगताप यांच्यावर अनेक घणाघात केले आहेत. स्नेहल जगताप यांनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे.
याशिवाय त्यांनी राजकीय आत्महत्या केल्याचा दावा देखील या शिवसैनिकांनी केला.
ज्यांच्या जीवावर यंदाची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली त्या निष्ठावंत शिवसैनिकांचा
आणि उद्धव ठाकरेंचा त्यांनी विश्वासघात व भ्रमनिरास केल्याची भावना येथील शिवसेना (Shivsena)
पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केली. तसेच, स्नेहल जगताप यांना राजकारणात भविष्यात कधीही यश मिळणार नसल्याचेही ते म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा झटका देणाऱ्या स्नेहल
जगताप यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केल आहे.
तसेच, राष्ट्रवादीत लवकरच महत्त्वाची जबाबदारी देखील त्यांना देण्यात येणार असल्याचे समजते.
तर, मी रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय
घेतल्याचे स्नेहल जगताप यांनी पक्षप्रवेशावेळी भाषण करताना म्हटले.
मात्र, स्नेहल जगताप यांनी घेतलेला निर्णय हा अतिशय दुर्दैवी असल्याचे
शिवसेना युबीटी जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांनी म्हटले.
तसेच, स्नेहल जगताप यांनी हा निर्णय घेऊन राजकीय आत्महत्या केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
स्नेहल जगताप यांच्यावर कोणती जबाबदारी?
दरम्यान, रायगडच्या सुतारवाडीत दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्या
निवासस्थानी स्नेहल जगताप यांचे कुटुंब भेटीला आले होते.
त्यावेळी तटकरे आणि जगताप कुटुंबात 2 तास बंद दाराआड चर्चा झाली.
अखेर जगताप यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा निर्णय नक्की झाला, त्यानुसार आज पक्षप्रवेशही झाला.
त्यामुळे, आता स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी पक्षात तटकरे यांच्याकडून कोणती जबाबदारी देण्यात येईल,
याचीच चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तर दुसरीकडे जगताप कुटुंबावर ठाकरेंची शिवसेना नाराज झाली आहे.
स्नेहल जगताप यांना भविष्यात कुठेही यश मिळणार नसल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे.