वाडेगाव येथे स्कूल वेनला ट्रकची जोरदार धडक – १० विद्यार्थी जखमी, ३ गंभीर; नागरिकांचा रस्ता रोको

वाडेगाव येथे स्कूल वेनला ट्रकची जोरदार धडक – १० विद्यार्थी जखमी, ३ गंभीर; नागरिकांचा रस्ता रोको

अकोला: अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे आज सकाळी एका भरधाव ट्रकने

शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल वेनला जोरदार धडक दिली,

यात १० विद्यार्थी जखमी झाले असून ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.

Related News

प्राप्त माहितीनुसार, विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक वाहनावरील नियंत्रण

गमावल्याने हा भीषण अपघात घडला. ट्रकने वेनला मागून

धडक दिल्यानंतर तो झाडावर जाऊन आदळला.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय

महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यांनी घटनास्थळी

रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. अपघाताची माहिती मिळताच

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Related News