Minister Meghna Bordikar News : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.
आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी हक्कभंग दाखल केला आहे.
बुलढाण्याच्या केस गळती प्रकरणावरून हा हक्कभंग दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतंय.
Related News
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
मुंबई : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.
अनेकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडल्याचे अधिवेशनात बघायला मिळाले.
आैरंगजेबाच्या कबरीवरून हे अधिवेशन गाजताना दिसले.
आता भाजपाच्या एका महिला राज्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.
आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय.
काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी हा हक्कभंग दाखल केलाय.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिल्यावरून हा हक्कभंग दाखल करण्यात आला.
बुलढाण्यात लोकांना टक्कल पडण्याच्या विषयी विधानपरिषदेत खोटी माहिती
दिल्याप्रकरणी हक्क भंग दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी बुलढाण्यातील लोकांचे अचानक टक्कल पडत असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली होती.
लोकांचे केस इतके जास्त गळत होते की, त्यांच्या डोक्याचे टक्कल पडत होते.
यादरम्यान रेशनवर मिळणा-या गव्हामधील सेलेनियममुळे लोकांचे केस गळत असल्याचे संशोधन पद्मश्री
डॉ. हिम्मतराव बाविस्कर यांनी संशोधन केले आहे. मात्र, मंत्री मेघना बोर्डीकर यांनी गव्हातील
सेलेनियममुळे केस गळती होत नाही अशी माहिती सभागृहाला दिली.
सभागृहाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यामुळे काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी हक्कभंग दाखल केलाय.
विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी हा हक्कभंग दाखल करून घेतल्याचीही माहिती मिळतंय.
यामुळे आता मेघना बोर्डीकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसतंय.
काहीही न करता बुलढाण्यात लोकांची केस गळत होते आणि टक्कल पडत होते.
या प्रकरणानंतर शासनाच्या पथकाने पाहणी केली.लोकांचे असे अचानक टक्कल का पडत आहे?
याचा देखील शोध घेण्यात आला. यादरम्यान पद्मश्री डॉ. हिम्मतराव बाविस्कर यांनी संशोधन केले आणि त्यांना आढळले की,
रेशनवर मिळणा-या गव्हामधील सेलेनियममुळे लोकांचे केस गळत आहेत.
मात्र, सभागृहात मेघना बोर्डीकर यांनी गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नसल्याचे म्हटले.
यामुळे काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी मेघना बोर्डाकरांविरोधात थेट हक्कभंग दाखल केला आहे.
आता यावर मेघना बोर्डीकर काय भाष्य करतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.