LSG vs DC : IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला एक विकेटने हरवलं.
या मॅचनंतर लखनऊ फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयनका आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये मैदानावर चर्चा झाली.
त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. क्रिकेट फॅन्स याची तुलना मागच्यावर्षी केएल राहुल सोबत झालेल्या संभाषणाशी करत आहेत.
Related News
Shivsena Supreme Court Hearing : ‘आमच्याकडे अधिकार आहेत’, शिवसेना खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या आणि बहुचर्च...
Continue reading
लखनऊत पत्नी आणि बहिणीवर दिवसाढवळ्या गोळीबार; ICICI बँकेबाहेर दुहेरी हत्याकांड
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमतीनगर परिसरात गुरुवारी दिवसाढवळ्य...
Continue reading
ब्लॅक कॉफी आणि लिंबाचा रस एकत्र पिणे फायदेशीर की नुकसानकारक? वजन कमी करण्याच्या दाव्यांमागचं सत्य जाणून घ्या
चहा आणि कॉफी हे भारतीयांच्या दैनंदिन...
Continue reading
अरुणाचलमधील चीनच्या हालचालींवर किरेन रिजिजूंचे मोठे विधान; 60 किलोमीटर घुसखोरीचा दावा फेटाळला
अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर चीनच्या हालचालींबाबत ...
Continue reading
शिवसेना कोणाची? आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी; ही दोन कलमं संपूर्ण गेम फिरवणार? असीम सरोदे यांनी सांगितलं गणित
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्...
Continue reading
Vinod Tawde : बिहारनंतर आता उत्तर प्रदेशात ‘खेला होबे’; विनोद तावडे यांच्यासमोर काय आव्हाने असणार? भाजप नेता काय जादू करणार?
बिहार : बिहार विधानसभा निवड...
Continue reading
Sergio Gor On Kashmir : भारताला जे अपेक्षित नाही ते घडलं; सर्जियो गोर यांचा लडाख दौरा रद्द, काश्मीरच्या मुद्द्यावर अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने का?
सर्जियो गोर यांच्या वक्तव्यानंत...
Continue reading
गृहकर्ज फेडलं? मग झटपट करा हे काम; बँकेकडून मागा ही 9 कागदपत्रं, यादीच पाहा
Home Loan Foreclosure : स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप...
Continue reading
SBI ग्राहकांना मोठा झटका! BSBD खात्याच्या नियमांत बदल; महिन्यात 4 पेक्षा जास्त पैसे काढल्यास द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI च्य...
Continue reading
नारायण राणेंचं नाव खासदारकीसाठी सूचवलं अन् धमक्या आल्या; दीपक केसरकरांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : रत्न...
Continue reading
मराठी चाचणीच्या अंमलबजावणीवरून आरटीओ यंत्रणेतच संभ्रम? प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होणार?
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आण...
Continue reading
थरारक! महिला मुख्याध्यापकावर 27 वेळा चाकूने वार; दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक
नलगोंडा : तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातून शिक्षणक्षेत्राला हादरवून ट...
Continue reading
IPL 2025 चा चौथा सामना खूपच रोमांचक ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायट्ंस यांच्यात
विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला.
एकवेळ लखनऊची टीम सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरीस त्यांचा एक विकेटने पराभव झाला.
लखनऊने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचा टार्गेट दिलं होतं. DC ने 65 रन्सवर 5 विकेट गमावले होते.
पण त्यानंतर सामना पूर्णपणे फिरला. लखनऊला आपलं टार्गेट डिफेंड करता आलं नाही.
या सामन्यानंतर असं काही घडलं की, ज्याने सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर फ्रेंचायजी मालक संजीव गोयनका मैदानावर दिसले.
संजीव गोयनका मागच्या सीजनच्यावेळी सुद्धा चर्चेत होते. LSG च्या पराभवानंतर मैदानातच त्यांचा कॅप्टन
केएल राहुल बरोबर वाद झाला होता. यावेळी ते पंतला काहीतरी सांगताना दिसले.
दोघांमध्ये काहीवेळ बोलणं झालं. टीमचे हेड कोच जस्टिन लँगर सुद्धा या चर्चेमध्ये दिसले.
या चर्चेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
केएल राहुल लखनऊपासून का वेगळा झाला?
2024 आयपीएल सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता.
सनरायजर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर संजीव गोयनका यांनी केएल राहुलला सुनावलं होतं.
या प्रकाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यानंतर बातमी आलेली की,
केएल राहुल आणि संजीव गोयनका यांच्यात सर्वकाही आलबेल नाहीय. त्यानंतर आता
चालू असलेल्या सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सपासून वेगळा झाला.
आशुतोष शर्माची स्फोटक इनिंग, मॅच फिरली
लखनऊने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 209 धावा केल्या.
निकोलस पूरनने सर्वाधिक 75 आणि मिचेल मार्शने 72 धावांची खेळी केली. डेविड मिलरने 27 धावांच योगदान दिलं.
प्रत्युत्तरात दिल्लीच्या टीमने 6.4 ओव्हर्समध्ये 65 धावांवर 5 विकेट गमावलेले.
त्यानंतर आशुतोष शर्मा एक स्फोटक इनिंग खेळला. त्याने 31 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावत दिल्लीच्या टीमला विजय मिळवून दिला.