मूर्तिजापूरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एक ठार – सहा ते सात जण जखमी

मूर्तिजापूरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एक ठार - सहा ते सात जण जखमी

अकोला (प्रतिनिधी) – अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील सिरसो बेड्यावर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

    झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मूर्तिजापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

  एकाचा मृत्यू, सहा ते सात जण जखमी

या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये महिलांचाही समावेश असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
घटनास्थळी मूर्तिजापूर पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Related News

  किरकोळ कारणावरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद किरकोळ कारणावरून सुरू झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले.
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

  जखमींवर उपचार सुरू

सर्व जखमींवर मूर्तिजापूर आणि अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

👉 या घटनेनंतर मूर्तिजापूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून,

      पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सतर्कता वाढवली आहे.

Related News