तेल्हारा (दि.) – शहरातील कब्रस्तानमधील विविध समस्या रमजान ईदपूर्वी सोडवण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी तेल्हारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कब्रस्तानकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, नाल्यातील चिखल आणि खोल वाटांमुळे मुस्लिम बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अंत्यविधी व धार्मिक विधींसाठी जाताना मोठी कसरत करावी लागत असून, ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो. तसेच, कब्रस्तानमध्ये स्वच्छतेचा अभाव असून, मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे.
Related News
मुंबई | प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE)
बारावीचा निकाल आज, 5 मे 2025 रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 91.88% लागला असून,
म...
Continue reading
IPL 2025 | मुंबई – आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी
या युवा क्रिकेटपटूने अशा कामगिरीची नोंद केली आहे, जी आजवर विराट कोहली,
धोनी...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला
असून यंदाचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे.
मुलींची उत्तीर्णता 94.58% अस...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी – पुणे शहरातील एका तरुणाने महामार्गावर जीव धोक्यात घालून केलेला
धोकादायक स्टंट कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे....
Continue reading
अकोला | प्रतिनिधी – अकोल्यातील तार फाईल परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.
सूरज गणवीर नावाच्या एका पतीने कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नी आणि ४ वर्षांच्...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी – अकोला जिल्ह्यात आज NEET 2025 ही महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा 18 केंद्रांवर पार पडत आहे.
या परीक्षेसाठी 7 हजार 848 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून,
अकोल...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी – अकोल्यातील मोठी उमरी परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात झाला.
शिव मंदिराजवळ श्री संत गुलाब बाबा बँड पार्टीची 407 गाडी आणि दुचाकी
यांच्यात जोरदार धडक होऊन दोन य...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारतीय रेल्वेने चारधाम यात्रा आता अधिक सोपी आणि आरामदायक करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून २७ मेपासून ‘भारत गौरव डीलक्स टुर...
Continue reading
चेन्नई | प्रतिनिधी –
तामिळनाडूच्या मच्छिमारांवर पुन्हा एकदा श्रीलंकन लुटारूंकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
अक्कराईपेट्टै येथील सेरुधुर गावातील ३० मच्छिमार माशांच्या शोधार्थ ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारत सरकारने देशाच्या समुद्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या ध्वजाखाली चालणाऱ्या कोणत्याही जहाजाला आता भारतीय ...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी –
गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडलेल्या सोन्याच्या किमतींमुळे सामान्य ग्राहक हतबल झाले होते.
मात्र, आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली ...
Continue reading
मुजफ्फरपूर (बिहार) | प्रतिनिधी –
बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मुशहरी नाथा भागातून एक अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे.
येथे एका क्रूर पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचा न...
Continue reading
पालिकेने यापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बसवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे कब्रस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
याशिवाय, कब्रस्तानच्या मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त उर्वरित गेट बंद करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हा रस्ता परिसरातील शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचा असून, शेतमाल वाहतूक करणे कठीण झाले आहे.
मागील दोन वर्षांत रस्ता सुधारण्याची वारंवार मागणी करण्यात आली, मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
या मागण्यांसाठी रस्ता विकास संघर्ष समिती, मुस्लिम आणि शेतकरी बांधवांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनावर रामभाऊ फाटकर, मतीन शाह, मो. शारिक, शारूख पठाण, शेख रहेमान, शेख सलीम, शेख फरीद, सय्यद निसार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागरिकांनी रमजान ईदपूर्वी या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.