नागपूर हिंसाचार प्रकरणी अद्यापही चर्चा सुरू असून दंगेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता.
तसंच, या हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून वसूल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, या हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर आज बुलडोझर चालवण्यात येणार आहे.
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली गेली. तर, दुसरीकडे कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्याचीही जोरदार चर्चा असून याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
यासह राज्यातील इतर घडामोडी पाहुयात.महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचं बीड करण्याचा चंग काहीजणांनी बांधला आहे.
कुणाल कामरा हा एक लेखक आणि विनोदी कलाकार आहे. तो स्वतःचे शो करत असतो. राजकीय व्यंगात्मक टीका टीप्पणी करत असतो.
त्याने आमच्यावरही टीका केलेली आहे. कालच्या पॉडकास्टमध्ये तो ठाणे की रिक्षा असं काहीतरी म्हणतोय.
यामध्ये कोणाला अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडण्याची काय गरज आहे. ५०-६० लोक जातात,
हातात लाठ्याकाठ्या घेतात आणि स्टुडिओ उद्ध्वस्त करतात. या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे.
देवेंद्र फडणवीसांनी गृहखातं सोडावं, कारण त्यांना ते झेपत नाही. गृहखात्याचा कारभार त्यांना झेपत नाही,
किंवा त्यांना काम करू दिलं जात नाहीय. बीड,नागपूरला काय झालं? आज राज्याच्या राजधानी
एका पॉडकास्टरला स्टुडिओ उद्ध्वस्त केला. पोलीस काय झोपा काढत होते? – संजय राऊत