New India Bank Fraud News : न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह सहकारी बँकेच्या 122 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी
(New India Cooperative Bank scam case) मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने जावेद आझम यांना अटक केली आहे.
New India Bank Fraud News : न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह सहकारी बँकेच्या 122 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
(New India Cooperative Bank scam case) मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने जावेद आझम यांना अटक केली आहे.
जावेद आझम हे भाजप नेता हैदर आझमचा भाऊ आहेत. जावेद यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून बँक घोटाळ्यातील आझम हा अटक झालेला सतवा आरोपी आहे.
जावेद आझमचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय
व्यावसायिक उन्नथन अरुणाचलनच्या अटकेनंतर चौकशीत नाव समोर आल्यानंतर जावेद आझमला चौकशीला बोलवण्यात आलं होतं.
चौकशीनंतर काल रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं जावेदला अटक केली आहे.
जावेद आझमचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय असून त्यासाठी उन्नथन अरुणाचलमने त्याला 18 कोटी दिल्याचा आरोप आहे.
बँक घोटाळा प्रकरणी आत्तापर्यंत 7 जणांना अटक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी न्यू इंडिया को-ऑप बँकेतील 122 कोटींची रक्कम गहाळ झाल्याबाबत चौकशी
केल्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी सदर घोटाळा समोर आला होता. याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक आणि अकाऊंट विभागाचे प्रमुख हितेश मेहता, माजी सीईओ अभिमन्यू भोअन,
बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, मालाड येथील व्यापारी उन्नाथन अरूणाचलम आणि
त्यांचे बंधू मनोहर अरुणाचलम आणि कंत्राटदार कपिल देढिया यांना अटक झालेली आहे.
जावेद आझम हे भाजप नेता हैदर आझमचा भाऊ आहे. 2022 साली हैदर आझम हे वादात अडकले होते.
त्यांची पत्नी रेशमा या बांगलादेशी नागरिक असून त्यांनी पासपोर्ट बनविण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याचा आरोप केला गेला होता.
मात्र नंतर त्यांच्या पत्नीची या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली.
न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह सहकारी बँकेच्या 30 पेक्षा जास्त शाखा
30 पेक्षा जास्त शाखा असलेल्या आणि बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे
संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच या बँकेवर ‘प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे.
त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले.
त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.