Eknath Shinde : औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सध्या तापले आहे.
ही कबर हटवावी अशी मागणी केली जात आहे.
Eknath Shinde : सध्या राज्यात खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
Related News
IMD चा मोठा इशारा! मान्सूनचा तडाखा वाढणार; मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने अनेक राज्यांना अलर्ट
IMD चा मोठा इशारा! पुढील 96 तास मुसळधार प...
Continue reading
Ladki Bahin Yojana तील पात्र महिलांना मोठा दिलासा? बच्चू कडूंचा सरकारला 30 जूनपर्यंत अल्टिमेटम
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री Lad...
Continue reading
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची लॉटरी? मोदी मंत्रिमंडळ विस्तारात पंजाबच्या दोन मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची संधी? मोदी सर...
Continue reading
वजनापलीकडील धोका! दीर्घकालीन सूज कशी बिघडवते यकृत, हृदय आणि रक्तातील साखरेचे आरोग्य?
मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यांसारख्या आजारांबाबत चर्चा झाली की बहुतेक वेळा लक्ष शरीराच्...
Continue reading
ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा; चुका टाळा आणि रिफंड लवकर मिळवा
आर्थिक वर्ष 2025-26 साठी आणि मूल्यांकन वर्ष (AY) 2026-27 साठी आयकर रिटर्न (
Continue reading
अन्न पॅकिंगसाठी वर्तमानपत्रांचा वापर थांबवा; FSSAI ची कडक सूचना
FSSAI ची कडक सूचना : रस्त्यावरील खाद्यपदार्थांपासून ते छोट्या हॉटेलांपर्यं...
Continue reading
फक्त कपड्यांपुरतेच नाही! अॅक्सेसरीजमधूनही करा कलर ब्लॉकिंगचा स्टायलिश प्रयोग
कलर ब्लॉकिंगचा नवा ट्रेंड : फॅशनमध्ये रंगांचा खेळ नेह...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: संभाषणातील ही एक सवय नकळत लोकांना तुमच्यापासून दूर करते
मानसशास्त्र सांगते : काही सवयी अशा असतात ज्या नातेसंबंधांमध्ये ...
Continue reading
'Hai Jawani Toh Ishq Hona Hai'ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी; दोन दिवसांत केवळ 23 कोटींची कमाई
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा बहुचर्चित रोमँटिक-कॉमेडी चित्रपट '
Continue reading
"महिला भूक भागवण्यासाठी नव्हे, तर भावनिक आधारासाठी खातात"; Shefali Shah यांचे भावनिक खाण्यावर भाष्य
बॉलिवूड अभिनेत्री Shefali Shah यांनी नुकतेच म...
Continue reading
'Peddi'चा बॉक्स ऑफिसवर धडाका कायम! तिसऱ्या दिवशीही कोट्यवधींची कमाई; 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेशाची तयारी
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतीक्षित चित्रपट '
Continue reading
World Food Safety Day 2026 : अन्नसुरक्षेबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज; जाणून घ्या महत्त्वाच्या समजुती आणि सत्य
अन्न हे मानवी जीवनाचे मूलभूत गरजांपैकी एक असले तरी त्याची सुरक्षित...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली ही कबर हटवावी, अशी मागणी वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून केली जात आहे.
राज्यातील काही पक्ष आणि राजकीय नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी, अशी भूमिका घेतली आहे.
त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा हाच मुद्दा आता थेट दिल्लीदरबारी पोहोचण्याची शक्यता आहे.
खुद्द एकनाथ शिंदेच केंद्रीय नेतृत्त्वाशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीच्या नेतृत्त्वाशी चर्चा करणार?
मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
या दिल्लीवारीत ते औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा केंद्रीय नेतृत्त्वाकडे उपस्थित करण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असताना शिंदे यांच्या या दिल्लीवारीला चांगलेच महत्त्व आले आहे.
खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात सहभागी होणार आहेत.
या सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर ते दिल्लीतील नेतृत्वाशी बातचीत करण्याची शक्यता आहे.
याच भेटीत ते महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर हटवण्याचा मागणीबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुक्तगिरी येथील पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला होतील रवाना होणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे?
विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांकडून राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवावी, ही मागणी घेऊन आंदोलन केले जात आहे.
याच मुद्द्यावर शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 मार्च रोजी पहिल्यांदाच भूमिका मांडली होती.
औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे, अशी शिवभक्तांची मागणी आहे. माझीही हीच भावना आहे,
असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. औरंगजेब महाराष्ट्राचा दुष्मन होता, राष्ट्रद्रोही होता, त्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे.
जे औरंगजेबाचे उदात्तीकरण करतात, त्यांना निषेध केला पाहिजे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली होती.