छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय.
संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्ध्यांनी औरंगजेबाला इथंच ठार मारलं.
त्यानंतर, औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर येथे बांधण्यात आली आहे.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
आता, या कबरीवरुन जोरदार वाद सुरू झाला आहे. औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीची जबाबदारी पुरातत्व विभागाला देण्यात आली
असून त्यांच्याकडून ही जतन करण्यात येत आहे. मात्र, ही कबर हटविण्याची मागणी जोर धरत आहे.
मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली जात आहे.
संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवली नाही तर विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वतः कबर हटवेल, असा इशाही सरकारला देण्यात आला आहे.
त्यातच, आता भाजप नेते सुनिल देवधर यांनी या कबरीला हटविण्यात येत नसेल तर तिथे थुंकण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केलीय.
महाराष्ट्रात देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे, जे काही होईल ते कायद्यानेच होईल.
औरंगजेबाच्या कबरीला उखडून टाकावे अशीच माझी देखील भूमिका आहे.
मात्र, जर या कबरीला हटविण्यात येत नसेल तर औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, अशी मागणी सुनिल देवधर यांनी एबीपी माझाशी बोलताना केली.
तसेच, संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर तशी व्यवस्था करण्यात यावी, तसे झाल्यास तिथलं पर्यटन वाढेल, असेही देवधर यांनी म्हटले.
औरंगजेबाची कबर उखडलीच पाहिजे, पण ते कायद्याने होत नसेल तर हा पर्याय असल्याचंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, सुनिल देवधर हे भाजपचे राष्ट्रीय सचिव होते, ते सध्या आंध्र प्रदेश भाजपचे सहप्रभारी आहेत.
तर, त्रिपुरामधील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.
कबरीसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
इथे महिमामंडन होईल तर फक्त शिवरायांचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तसेच, औरंगजेबाच्या कबरीला एएसआयने 50 वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे.
मात्र, या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीच होणार नाही. एक वचन तुम्हाला देतो,
काहीही झालं तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही, उदात्तीकरण होऊ देणार नाही,
तसा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न चिरडून टाकू, हे वचन छत्रपती शिवरायांच्या मंदिरासमोर देतो,
असे मुख्यमंत्र्यांनी भिवंडीतील कार्यक्रमातून ठणकावून सांगितले आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/