उत्तम कापूस प्रकल्प, कॉटन कनेक्ट, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त
विद्यमाने 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पिंप्री डिक्कर
(अकोट ब्लॉक) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
कार्यक्रमाची रूपरेषा व सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात क्षेत्रप्रवर्तक विजय रामराव डिक्कर यांच्या प्रास्ताविकाने झाली.
त्यानंतर सभापती सौ. हरिदीनीताई अशोक वाघोडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून
कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून
सभापती हरिदीनीताईंनी महिलांच्या हक्क, सशक्तीकरण आणि योगदानावर मनोगत व्यक्त केले.
महिलांसाठी विशेष स्पर्धा व खेळ
कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा आणि संगीत खुर्ची यांसारख्या मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले.
महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उत्तम कापूस प्रकल्पाविषयी माहिती
स्पर्धांनंतर क्षेत्रप्रवर्तक विजय डिक्कर यांनी उत्तम कापूस प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
महिलांनी या प्रकल्पाविषयी उत्सुकता दर्शवली आणि सक्रिय सहभाग घेतला.
महिला विजेत्यांचा सत्कार
स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या महिलांना गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.
महिलांनी आनंदाने सहभाग घेतला व कार्यक्रमाचा लाभ घेतला.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षेत्रप्रवर्तक संतोष बोरकर यांनी केले, तर क्षेत्रप्रवर्तक प्रविण लाखे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
कार्यक्रमास गावातील ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला गटाच्या CRP आणि BC महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तसेच क्षेत्रप्रवर्तक विजय डिक्कर, प्रविण लाखे, संतोष बोरकर, सागर सिरसाट,
गजानन नागे, कल्याणी गिऱ्हे, पूजा राजगुरू, प्रांजली इंगळे आणि वैशाली गाव्हाळे यांनीही उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमामुळे महिलांच्या सशक्तीकरणाला चालना मिळाली आणि त्यांचे योगदान अधिक प्रभावीपणे अधोरेखित झाले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/dahihanda-polis-thayyachaya-haddit-illegal-dhandyavar-bang/