अकोट: वारकरी संतांनी सुरू केलेल्या पंढरपूर वारीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे.
पंढरपूर वारी म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर, असे उद्बोधक विचार संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे सचिव
व प्रख्यात कीर्तनकार हभप रविंद्र वानखडे यांनी व्यक्त केले.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
विदर्भातील देहू कालवाडी येथे झालेल्या संत तुकाराम बीज सोहळ्यातील कीर्तनात ते बोलत होते.
वारी म्हणजे भक्तीचा प्रवाह
“पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थात ||
” या संत तुकोबारायांच्या अभंगाचा भावार्थ सांगताना ते म्हणाले की,
वारी करताना एकादशीचे व्रत आणि अखंड नामस्मरण हे वारकऱ्यांचे मुख्य आधारस्तंभ असतात.
विठुरायाचे नाव कल्पांतीचे बीज आहे, अवघ्या अस्तित्वाचे कारण आहे.
वारी म्हणजे भक्तीचा सोहळा, संस्कृतीचा वारसा आणि संतपरंपरेचा गौरव.
जसे सासरी गेलेली मुलगी माहेरी जाण्यासाठी आतुर असते,
तसेच वारकरी आपल्या मायबाप विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतो.
नाचत-गात, टाळ-मृदंगाच्या निनादात, रिंगण, फुगडी आणि भारुडे करीत भक्तीचा हा प्रवाह अखंड वाहत असतो.
ही परंपरा मराठी सांस्कृतिक वारशाचे अनमोल वैभव आहे, असा विचार त्यांनी मांडला.
श्रद्धासागर आणि कालवाडी तीर्थस्थळाचे स्मरण
दरम्यान, श्रद्धासागर व कालवाडी ही तीर्थस्थळे उभारणारे थोर व्यक्तिमत्व
वै. पंजाबराव हिंगणकर यांचे पुण्यस्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या हस्ते हभप
रविंद्र महाराज वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.