मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आत्मक्लेष धरणे सत्याग्रह

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आत्मक्लेष धरणे सत्याग्रह

अकोला – मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे, या मागणीसाठी

अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने अकोल्यात आत्मक्लेष धरणे सत्याग्रह करण्यात आला.

यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, गुन्हेगारी नियंत्रण,

Related News

थोर पुरुषांचा होणारा अपमान रोखणे आणि स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील

आरोपींवर कठोर कारवाई यासह विविध मागण्या मांडल्या.

स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी,

तसेच धनंजय मुंडे यांच्यावर हत्या गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

थोर महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि विकृत

इतिहास सांगणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशीही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात वारंवार दिलेली आश्वासने फसवी ठरत असल्याने मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे.

शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात राजेश देशमुख, गजानन हरणे, दादाराव पाथीकर, प्रदीप खाडे, राम मुळे,

देवराव हागे, विनायक पवार, सुभाष पाटील, प्रदीप चोरे, नंदकिशोर गावंडे

यांच्यासह अनेक मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.

Read more news here :https://ajinkyabharat.com/muli-awadatat-mhanun-theate/

Related News