अन्यायग्रस्त डोंगरे कुटुंब महिलांसह मुंबई येथील आझाद मैदानावर न्यायासाठी बसले उपोषणाला.

अन्यायग्रस्त डोंगरे कुटुंब महिलांसह मुंबई येथील आझाद मैदानावर न्यायासाठी बसले उपोषणाला.

दै.अजिंक्य भारत/प्रतिनिधी
अंढेरा/दे.राजा

देऊळगाव राजा नगरपालिकेचे मुख्यधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांनी नॅशनल हवेच्या रस्त्याचे पाच

वर्षांपूर्वीच अंदाजे 18 कोटी रुपये खर्चून काम झाले असताना शासनाकडे रस्त्याबाबत पाठपुरावा करून शंभर

Related News

कोटी निधी मंजूर करून नॅशनल हयवे नगरपालिकेला हॅन्ड वर्क करून घेतला आणि तो निधी खर्च करण्यासाठी

आणि त्यातून मिळालेली टक्केवारीसाठी संबंधित ठेकेदारासोबत संगमत करून मनमानी अरेरावी करून रस्त्यावरील डोंगरे

परिवाराच्या स्वतःच्या मालकीची असलेली घरे,दुकाने यांना कोणतीही पुर्व सूचना न देता भूसंपादन न करता

मोबदला न देता जेसीबी द्वारे पाडली याबाबत संबंधित अन्यायग्रस्त कुटुंबाने पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय,

पोलिस अधीक्षक कार्यालय बुलढाणा इथे तक्रारी दिल्या परंतु त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांनी आता

दिनांक ४ मार्चपासून नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देऊन आझाद मैदान येथे अरुण मोकळ यांच्यावर

ॲट्रॉसिटी गुन्हा तसेच निलंबनाची कारवाईसाठी तसेच न्यायासाठी उपोषण सुरू केले आहे.गोर गरीबांना आपल्याला न्याय

हक्कासाठी चक्क मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसावे लागत आहे.यासंदर्भात चौकशी समिती गठीत

करण्यात आली सदर चौकशी समितीने आतापर्यंत कुठलाही चौकशी केली नसल्याचे अन्यायग्रस्त डोंगरे कुटुंबाचे म्हणणे आहे.
———————————————————————
लवकरच अमरावती येथे आंदोलन छेडणार!

नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांनी नगरपालिकेमध्ये मनमानी करत ठेकेदाराशी आर्थिक संगमत

करून निकृष्ट दर्जाचे कामे करून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून अतिक्रमणाच्या

माध्यमातून जनतेची मानसिक आणि आर्थिक लूट करून त्रास दिला आहे.याबाबत माझ्या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे सिंदखेड

राजाचे मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली असून.सदर समिती ही स्थानिक असल्यामुळे

दबावाखाली येऊन चुकीचा अहवाल देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास आपण विभागीय कार्यालय

अमरावती येथे तिव्र स्वरुपाचे मोठे आंदोलन छेडणार असल्याचे अनिल चित्ते शिवसेना तालुकाप्रमुख यांनी दैनिक अजिंक्य भारत ला प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.

Read more news here : 

https://ajinkyabharat.com/mala-chatke-datana-aidancha-mahanayche-hot-sayache-chick-dileli-tarunanam-sangitli-dhakkadayak-aapbati/

Related News