Donald Trump : दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकी काँग्रेसला संबोधित करत आहेत. राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचं हे पहिलं संबोधन आहे.
सगळ्या जगाची ट्रम्प यांच्या भाषणावर नजर आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच काही निर्णय घेतलेत. त्याचा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे.
Related News
माझे संपूर्ण आयुष्य बदलले; कॅन्सर सर्जरीनंतर Dipika Kakkar चे भावनिक मनोगत
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Dipika Kakkar इब्राहिम सध्या आयुष...
Continue reading
राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती
महाराष्ट्र सरकारने 1989 बॅचच्या आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांना राज्याचा मुख्य स...
Continue reading
पुणे मेट्रो फेज-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; दोन नवीन मार्गिकांमुळे शहरभर कनेक्टिव्हिटी मजबूत
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी गती देणाऱ्या मेट्रो फेज-2 प्रकल्पाला अखे...
Continue reading
रणदीप हुड्डा–लिन लाईश्रम यांच्या दुसऱ्या लग्नवाढदिवशी गोड बातमी; पहिल्या अपत्याची चाहत्यांना आनंदवार्ता
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्र...
Continue reading
भारत-अमेरिका मोठा संरक्षण करार: नौदलाच्या MH-60R हेलिकॉप्टर ताफ्यासाठी 7,995 कोटींचा सपोर्ट डील
Continue reading
सयाजी शिंदे नाशिक तपोवन झाड बचाव मोहीमेवर प्रचंड भूमिका
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवनातील झाडांवर ...
Continue reading
रात्री झोप येत नाही? मन सतत विचार करतंय? प्रेमानंद महाराजांचा सोपा उपाय जाणून घ्या
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोकांना रात्री शांत झोप मिळत ना...
Continue reading
आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे: रोज आहारात Beans चा समावेश का करावा?
Beans : आधुनिक जीवनशैलीत संतुलित आहार घेणे हे एक आव्हान बनले आहे. अनेकदा लोक महागड्या सुपरफूड्सकडे वळता...
Continue reading
Air Quality in Mumbai Has Seriously Deteriorated: इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून
Continue reading
रोज रात्री Ajwain Waterपिल्यावर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या 1 महिन्याचा अनुभव
Ajwain Water : अनेक घरांमध्ये आरोग्यविषयक काळजी ही आजही आजी-आज...
Continue reading
लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींसाठी बंपर लॉटरी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून थेट मोठी घोषणा
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘
Continue reading
टाकळी बु : अकोला-वाशिम जिल्हा बँकेवर विजय म्हैसने यांची प्रतिनिधी म्हणून निवड
अकोट तालुक्यातील टाकळी बु सेवा सहकारी सोसायटीतील विशेष सभेत विजय रमेशराव म...
Continue reading
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकी काँग्रेसमध्ये संबोधन सुरु आहे.
त्यांच्या भाषणावर सगळ्या जगाची नजर आहे. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ते अमेरिका इज बॅक म्हणाले.
अमेरिकेचा अभिमान, विश्वास परत आलाय असं ट्रम्प म्हणाले. “आपण निवडणुकीत शानदार विजय मिळवला.
सर्व स्विंग स्टेट्स जिंकली” असं ट्रम्प म्हणाले. “सत्तेत आल्यानंतर मी अनेक आदेशांवर स्वाक्षरी केली.
मी सहाआठवड्यात 400 पेक्षा जास्त निर्णय घेतले. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी सर्वांना एकत्र मिळून काम करावं लागेल.
ही मोठी स्वप्न पाहण्याची वेळ आहे” असं डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले.
“मी WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. मी माझ्या पहिल्या कार्यकाळात अनेक नियम बनवले होते.
यावेळी सुद्धा तसच करतोय. अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य परत आलय.
इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत भाषा बनवण्यासंबंधीच्या एका आदेशावर मी स्वाक्षरी केलीय” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
मेरिटच्या आधारावर नोकऱ्यांमध्य भरती होईल असं ट्रम्प म्हणाले.
बायडेन यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, “त्यांच्या सरकारमध्ये अंड्याची किंमत गगनाला भिडलेली.
पण आम्ही महागाईवर नियंत्रण मिळवतोय. आम्ही पॉवर प्लांट बनवत आहेत.
आमचा फोकस त्यावर आहे” “आमचं सरकार अलास्का येथे गॅस पाईपलाईनवर काम करत आहे.
करदात्यांचा पैसा वाचवण्यासाठी आम्ही
DOGE ची स्थापना केलीय. त्याची जबाबदारी मी इलॉन मस्कवर सोपवलीय” असं ट्रम्प म्हणाले.
भारताबद्दल काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅक्स कटची घोषणा केली. ते म्हणाले की, “चीन, भारत, ब्राझील सारखे देश आपल्यावर टॅरिफ लावतात.
हे चांगलं नाहीय” “जे देश आमच्यावर टॅरिफ लावणार, आम्ही सुद्धा त्यांच्यावर टॅरिफ लावणार. ही प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरु होईल.
टॅरिफच्या माध्यमातून पुन्हा अमेरिकेला श्रीमंत बनवायच आहे”
असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. आपल्या संबोधनात त्यांनी पोलिसांसाठी मोठी घोषणा केली.
“अमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्यास मृत्यूदंडची शिक्षा दिली जाईल” असं ट्रम्प म्हणाले. सध्या अमेरिका आणि युरोपचे संबंध ताणले गेले आहेत.
ट्रम्प नाटोमधून बाहेर पडण्याची सुद्धा घोषणा करु शकतात. पण असं केल्यास अमेरिकेच युरोपवरील वर्चस्व कमी होईल.