पातूर तालुक्यातील सस्ती गावातील श्वेता संतोष इंगळे हिने संपूर्ण भारतातून अबॅकस गणित परीक्षेत प्रथम क्रमांक
मिळवून गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. श्री जागेश्वर प्रोऍक्टिव्ह अबॅकस
आणि सनराईज कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी असलेल्या श्वेताने शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
स्तरावरील अबॅकस परीक्षेत अव्वल स्थान पटकावले.
ही परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते. 100 गणिती प्रश्न केवळ 3 मिनिटांत
अचूक उत्तरांसह सोडवून श्वेताने सर्व स्पर्धकांना मागे टाकले आणि आपले प्राविण्य सिद्ध केले.
5000 हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला होता,
मात्र श्वेताने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पहिल्या क्रमांकावर नाव कोरले.
तिच्या या यशामागे प्राध्यापक बराटे सर आणि सनराईज कॉन्व्हेंटचे अध्यक्ष ऍडव्होकेट
श्रीकांत ताले सर यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनी
असूनही तिने कठोर मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केले.
श्वेताच्या या अद्वितीय यशामुळे सस्ती गावात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या कुटुंबीयांसह
संपूर्ण तालुका तिच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. प्रथम क्रमांकाच्या बक्षीस सोबत
तिला सायकलही देण्यात आली आहे. या विजयामुळे भविष्यातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल,
असे मत शिक्षकांनी आणि पालकांनी व्यक्त केले आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/santra-mrig-bahrache-deth-suki-burshijanya-rogamue-jhaleliya-nukasanich-survey-karoon-madat-dya/