सांगली जिल्हा कारागृहाचा संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय
सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
80 कैदी कोल्हापूर मधील कळंबा जेल मध्ये हलवले आहे.
सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
यामध्ये 20 महिला कैदी आणि 60 पुरुष कैदी यांचा समावेश आहे.
कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी काही कैद्यांना
हलवले जाणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
याशिवाय कारागृहातील अन्न धान्य, कागदपत्रे, शास्रात्रे, दारुगोळा
सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे.
सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने महापुराची भीती वाढली आहे.
राजाराम बंधाऱ्यावर पाण्यची पातळी 43 फूट 2 इंचांवर पोहोचली आहे.
राधानगरी धरण सुद्धा 100 टक्के भरलं असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील
संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी काल
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार तसेच एच. के. पाटील यांची भेट घेतली.
सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे सज्ज आहे.
पुरस्थिती निर्माण झाल्यास आवश्क तो अन्नधान्यसाठा,
आणि इतर वस्तुंचा साठा करून ठेवण्यात आला आहे.
त्याचबरोबर कारागृहातील संगणक कक्ष, कागदपत्रे सर्व गोष्टी
पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/non-types-of-certificates-in-mpsc-exams/