लम्पी आजाराचा कहर; आठ गाईंचा मृत्यू, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथे लम्पी आजाराने आठ गाईंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात लम्पी आजाराने थैमान घातले असून, या साथीच्या आजारामुळे जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पशुपालक भीमराव खंडारे यांना मोठा आर्थिक फटका
स्थानिक पशुपालक भीमराव खंडारे यांच्या तबेल्यात तब्बल १६० गाई आणि गुरे आहेत. ते अनेक वर्षांपासून पशुपालनाचा व्यवसाय करीत असून, दरवर्षी ते आपल्या गुरांच्या कळपाला चारा उपलब्ध असलेल्या भागात नेतात. सध्या त्यांचा कळप जनुना शिवारात आहे आणि इथेच Lumpy Skin Disease आजाराचे संक्रमण वेगाने पसरत आहे. गेल्या काही दिवसांत या आजारामुळे खंडारे यांच्या आठ गाईंचा मृत्यू झाला असून, अनेक गायी गंभीर अवस्थेत आहेत.
लम्पी आजाराची लक्षणे आणि उपचार
खंडारे यांनी सांगितले की, Lumpy Skin Disease आजार झालेल्या गायींना ताप येणे, त्वचेवर गाठी उठणे, शरीर सुजणे आणि भूक मंदावणे अशी लक्षणे दिसत आहेत. त्यांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले असून, प्रशासनाकडून औषधोपचार सुरू आहेत. तरीही आजाराचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने पशुपालकांमध्ये भीती वाढत आहे.
Related News
मोठा निर्णय! Bangladeshi Illegal Immigrants आता राज्यात आळा बसणार
राज्यात बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार...
Continue reading
रेशन दुकानावर साखर मिळेना? दानापुरातील अंत्योदय कार्डधारकांची प्रतीक्षा कायम
दानापुर (ता. तेल्हारा, जि. अकोला) –शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत (PDS)...
Continue reading
दानापुरात अंत्योदय कार्डधारकांना साखरेचा तुटवडा; वर्षभर पुरवठा ठप्प, उत्सव काळात लाभार्थ्यांची निराशा
तेल्हारा तालुक्यातील पुरवठा ठप्प, शासनाच्या दुर्लक्...
Continue reading
बाळापूर: तालुक्यातील वाडेगाव येथील कृषी उत्पन्न उप बाजार समितीत अनेक सुविधा नसल्यामुळे शेतकरी गंभीर त्रासात आहेत. या...
Continue reading
स्थानीक गुन्हे शाखेची अचूक कारवाईअकोला – पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारीवर प...
Continue reading
भिवापूर हादरलं! वडिलांच्या निधनानंतर दोन महिन्यांत मुलाचाही मृत्यू, आईवर दुःखाचा डोंगर
नागपुर जिल्ह्यातील भिवापूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अव...
Continue reading
कर्ज आणि अतिवृष्टीमुळे पार्डी येथील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
पातूर तालुक्यातील ग्राम पार्डी येथील शेतकरी दादाराव नरिभान हिवराळे यांनी 9 ऑक्...
Continue reading
जागतिक हात धुवा दिवस बार्शीटाकळी तालुक्यातील शाळांमध्ये उत्साहात साजरा
बार्शीटाकळी: जागतिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात प्रत्येक वर्षी 15 ऑक्टोबर ...
Continue reading
महाराष्ट्र: ६ कोटींच्या इनामाचा टॉप नक्षली भूपती आत्मसमर्पण; आणखी ६० नक्षल्यांनी टाकली शस्त्रं
गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणान...
Continue reading
अकोट सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार; कार्यालय बंद असल्याने नागरिक त्रस्त
Continue reading
विद्यालयाची ओळख आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्व
पातुर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ही शालेय शिक्षणात नावाजलेली संस्था आहे. शालेय शिक्षणात शैक्षणिक गुणवत्ता इ...
Continue reading
वनविभागाच्या सतर्कतेने चार मोरपिल्लांचे प्राण वाचले — अकोल्यात घडली संवेदनशील कृती
अकोला :आदर्श म्हणजे केवळ शब्द नाही, तर कृतीतून उमटलेली प्रेरणा असते. ...
Continue reading
शासनाकडे लसीकरण मोहिमेला गती देण्याची मागणी
या घटनेनंतर जनुना आणि आसपासच्या गावांतील इतर पशुपालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. Lumpy Skin Disease आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने तातडीने लसीकरण मोहिम राबवावी आणि प्रभावित भागात औषधोपचार वाढवावेत, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि पशुपालकांनी केली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/7-surprising-facts-night-perfume-or-attar-attracts-negative-energy/