इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे डेटिंग ॲप्सचा वापरही झपाट्याने वाढत आहे. विविध प्रकारच्या डेटिंग प्लॅटफॉर्मवर लोक नवीन मित्र शोधतात, संवाद साधतात आणि प्रत्यक्ष भेटीही ठरवतात. मात्र अशाच एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने ऑनलाइन सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
समलिंगी व्यक्तींसाठी असलेल्या एका डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर एका तरुणाला भेटीसाठी बोलावण्यात आले. सुरुवातीला ही एक सामान्य भेट असल्याचे वाटत होते. मात्र ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तो एका नियोजित सापळ्यात अडकला. त्याला धमकावत खाजगी फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवत त्याच्याकडून तब्बल 31 हजार रुपये उकळण्यात आले.
विशेष म्हणजे, पीडिताने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी सात आरोपींना अटक करत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला.
Related News
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्...
Continue reading
मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधा...
Continue reading
8 महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून बेपत्ता; नाशिकमध्ये खळबळ, अपहरणाचा गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसो...
Continue reading
दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या; शेतात फेकला मृतदेह, 50 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींना पकडले
Delhi Crime News : राजधानी दिल्लीत अल्पवयीन मुलीवर सा...
Continue reading
135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; मुंबई-छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अं...
Continue reading
खात्यात अचानक पैसे आले… आणि अचानक गेले? सायबर फ्रॉडवर RBIचा मोठा वार; संशयास्पद व्यवहारांवर लागणार ‘डेबिट होल्ड’
RBI : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर पाहता सायबर फसवणुकीच्या घटनांम...
Continue reading
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात पिस्तुल...
Continue reading
पतीकडून संशय अन् सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणातील FIR मधून धक्कादायक खुलासे
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्याच्या उपळी बुरुजावर रा...
Continue reading
मुलाच्या तोंडात चॉकलेट असतानाच कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी घेतला धक्कादायक निर्णय; नळदुर्ग किल्ला प्रकरणात नवे खुलासे
नळदुर्ग : राष्ट्रीय दर्जाची कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्य...
Continue reading
महाराष्ट्राची ‘वाघीण’ कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात नळदुर्ग किल्ल्यातील रजिस्टर नोंदीने खळबळ; ‘पती पाठीमागून येत आहेत’ सांगून किल्ल्यात प्रवेश
महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात आपल...
Continue reading
महाराष्ट्र पुन्हा हादरला! खासगी शाळेच्या बस चालकाकडून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
नवी मुंबईतील धक्कादायक घटना; आरोपी बस चालकाला अटक, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
नवी मुंबई आणि पन...
Continue reading
अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड गावाजवळ चार महिलांना कारने धडक...
Continue reading
डेटिंग ॲपवरून झाली ओळख
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्रनगर जिल्ह्यातील लखतर तालुक्यात राहणाऱ्या एका तरुणाने समलिंगी व्यक्तींसाठी असलेले डेटिंग ॲप डाउनलोड केले होते. त्या ॲपवर त्याची काही व्यक्तींशी ओळख झाली. नियमित चॅटिंगमुळे त्यांच्यात विश्वास निर्माण झाला आणि काही दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटण्याचा प्रस्ताव समोर आला.
समोरच्या व्यक्तींनी सुरेंद्रनगर शहरातील एका ठिकाणी भेटण्याचे निमंत्रण दिले. तरुणाने त्यावर विश्वास ठेवत भेटीसाठी जाण्याचा निर्णय घेतला.
निर्जन घरात पोहोचताच परिस्थिती बदलली
भेटीचे ठिकाण सुरेंद्रनगर मेडिकल कॉलेजच्या मागील बाजूस असलेले एक निर्जन घर होते. तरुण तेथे पोहोचताच त्याच्या लक्षात आले की, तिथे एक नव्हे तर आधीपासून सात जण उपस्थित होते.काही क्षणांतच त्या सर्वांनी त्याला घेरले. त्यानंतर त्याला धमकावण्यात आले, मारहाण करण्यात आली आणि त्याचे खाजगी फोटो तसेच व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले.