6,6,6,6,6,2, एका ओव्हरमध्ये पाच षटकार ,लोचन गौडाचा स्फोटक खेळ

पाच षटकार, 32 धावांचा कहर!

लोचन गौडाचा स्फोटक खेळ; एका ओव्हरमध्ये पाच षटकार, 32 धावांचा कहर!

क्रिकेटप्रेमींसाठी रोमांच उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कर्नाटकातील महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धेत 23 वर्षीय ओपनर लोचन गौडाने आपल्या बॅटिंगची खरी ताकद दाखवत

गोलंदाजांना अक्षरशः नामोहरम केले. मैसूरमध्ये झालेल्या सामन्यात मंगळुरु ड्रॅगन्स संघाच्या लोचनने फक्त 32 चेंडूत 63 धावा ठोकत प्रतिस्पर्धी शिवमोगा लायन्स संघावर धडाकेबाज हल्ला चढवला.

पण सर्वात धक्कादायक क्षण आला 11 व्या षटकात—जेव्हा लोचनने गोलंदाज डी. अशोकच्या टप्प्याटप्प्याने धुलाई करत एका ओव्हरमध्ये तब्बल 32 धावा कुटल्या.

त्या षटकात लोचनने सलग चार षटकार, नंतर दोन धावा आणि पुन्हा एक षटकार ठोकला. अशा थरारक फटक्यांनी प्रेक्षकांची श्वास रोखून धरली.

या खेळीत त्याने एकूण ५ षटकारे आणि २ चौकारे ठोकत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले.

आता या खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून क्रिकेट चाहत्यांमध्ये लोचन गौडाची धडाकेबाज चर्चा सुरू आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/bayapur-akola-rhodwar-dhavatiya-basala-fire-pravasi-sukhup/