२९५ थकीत लाभार्थ्यांचे संकलित शिबिर संपन्न

२९५ थकीत लाभार्थ्यांचे संकलित शिबिर संपन्न

बाळापूर : पंचायत समिती अंतर्गत वाडेगाव ग्रामपंचायतीत प्रधान मंत्री आवास योजनेच्या

थकीत लाभार्थ्यांसाठी आज संकलित शिबिर घेण्यात आले.

एकूण १,०२४ घरकुल उद्दिष्टांपैकी ७२९ लाभार्थ्यांनी आधीच कागदपत्रे पूर्ण केली असून

 उर्वरित २९५ लाभार्थ्यांची कागदपत्रे आजच्या शिबिरातून जमा करण्यात आली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गटविकास अधिकारी नाना पजई यांनी थेट

ग्रामपंचायतीस पत्र देत ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हे शिबिर आयोजित केले.

या उपक्रमामुळे लाभार्थ्यांचा पहिला हप्ता लवकरात लवकर वितरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिबिराच्या आयोजनाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

उपस्थितांत गटविकास अधिकारी नाना पजई, जि.एस. गुंठेकर, पी.जी. नाकाट, कल्याणी बरडीया, संदीप आढे, झनके,

ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पवन पाटील, ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र इंगळे, सरपंच मेजर मंगेश तायडे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचा समावेश होता.

लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read also :https://ajinkyabharat.com/village-manju-yethil-married-tarun-bepta-tighaunirudh-gunha-admission/