27 मजली अँटिलियाच्या टॉप फ्लोअरवरच का राहतो अंबानी परिवार? वाचा या आलिशान राजवाड्याच्या काही अनोख्या गोष्टी

27 मजली अँटिलियाच्या टॉप फ्लोअरवरच का राहतो अंबानी परिवार? वाचा या आलिशान राजवाड्याच्या काही अनोख्या गोष्टी

मुंबई प्रतिनिधी |

भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान ‘अँटिलिया’ ही केवळ एक इमारत नसून एक भव्य आणि विलासी राजवाडाच आहे.

मुंबईतील या 27 मजली गगनचुंबी इमारतीसाठी अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

Related News

मात्र सर्वांत वरच्या मजल्यावरच अंबानी कुटुंब का राहते?

यामागची काही आश्चर्यकारक कारणं आता उघड झाली आहेत.

सर्वोच्च मजला – हवा, प्रकाश आणि वास्तुशास्त्र

अंबानी कुटुंब टॉप फ्लोअरवर राहते कारण तेथून सर्वोत्तम नैसर्गिक प्रकाश आणि हवा मिळते.

तसेच, वास्तुशास्त्रानुसार घराचे प्रमुख वास्तव्य वरच्या मजल्यावर असावे, असा विश्वास आहे.

म्हणूनच अंबानींनी 27 व्या मजल्यावर आपले निवासस्थान बनवले आहे.

पारंपरिक एसी नव्हे, खास ‘सेंट्रल कुलिंग सिस्टिम’

अँटिलियामध्ये पारंपरिक एअर कंडिशनर युनिट्स वापरले जात नाहीत, कारण त्याचे बाह्य युनिट्स इमारतीच्या सौंदर्यावर परिणाम करू शकतात.

त्याऐवजी, इथे एक विशेष सेंट्रल कुलिंग सिस्टिम बसवण्यात आली आहे,

जी केवळ राहणाऱ्यांसाठी नाही, तर फुलं आणि कलाकृतींचे संरक्षण करण्यासाठीदेखील वापरली जाते.

थंडी कमी? व्यवस्थापकांचा नकार

या इमारतीत जर कोणी एसी कमी करण्याची विनंती केली,

तर व्यवस्थापन स्पष्ट नकार देते. कारण ही कुलिंग सिस्टिम मानवांच्या गरजांपेक्षा अधिक,

इमारतीतील मौल्यवान वस्तूंचे जतन करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

Related News