सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धक्कादायकरित्या कोसळला.
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
पुतळा कोसळल्यावरुन महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे
महाविकास आघाडी तर्फे राजधानी मुंबईमध्ये येत्या 1 सप्टेंबर रोजी मोर्चा काढला
जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा आज केली.
महाविकास आघाडीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार
परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
उपस्थित होते. ठाकरे यांनी या वेळ म्हटले की, येत्या 1 सप्टेबरपासून मुंबई येथील
हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत
मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विरोधी पक्षातील सर्व नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, राज्यात सरकार स्थापन
करण्यासाठी महायुतीला अनेक इंजिन लावली. पण जितकी इंजिन जोडली गेली तेवढा
भ्रष्टाचारही वाढतो आहे. या भ्रष्टाचार आणि अत्याचारी सरकारला जनताच धडा शिकवेल.
महाराजांचा पुतळा पडला त्या ठिकाणी विरोधकांनी निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले.
तर हे शिवद्रोही लोक तिथेही आडवे आले, आता जनताच या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल
असे ठाकरे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/increase-in-security-of-rashtriya-swayamsevak-sangh-and-sarsanghchalaks/