Maharashtra Police Bharti: 15631 जागांसाठी शासनाने दिली मान्यता, भरती प्रक्रिया लवकरच सुरु
मुंबई, महाराष्ट्र: महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने १५,६३१ पदांच्या पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरतीला अधिकृत मान्यता दिली आहे.
हा निर्णय राज्यभर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींना मोठा दिलासा देणारा ठरला आहे.
या निर्णयानुसार लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन शासनकडून उपलब्ध केले जाईल.
मंत्रिमंडळाचा निर्णय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५,६३१ पदांवर
पोलीस भरती करण्याचा निर्णय मंजूर झाला. या निर्णयानुसार गृह विभागाने पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई संवर्गातील
रिक्त पदे भरण्यास शासनाला प्रस्ताव पाठवला आणि शासनाने मान्यता दिली.
रिक्त पदांची माहिती
पदनाम | रिक्त पदांची संख्या |
---|---|
पोलीस शिपाई | 12,399 |
पोलीस शिपाई चालक | 234 |
बॅण्डस्मन | 25 |
सशस्त्र पोलीस शिपाई | 2,393 |
कारागृह शिपाई | 580 |
एकूण | 15,631 |
ही पदे १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त झालेली आहेत किंवा रिक्त होणार आहेत.
यामध्ये सन २०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादेची अट ओलांडलेले उमेदवार एकदाच विशेष अर्ज करण्यास पात्र राहतील.
भरती प्रक्रिया आणि परीक्षा शुल्क
भरती OMR आधारित लेखी परीक्षा पद्धतीने होईल.
सामान्य प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क: रु.450/-
मागास प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क: रु.350/-
अर्ज केलेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेसाठी खर्च केली जाईल.
उमेदवारांसाठी महत्त्व
महाराष्ट्रात लाखो तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर पोलीस शिपाईसाठी अर्ज प्रक्रिया
सुरु होण्याची अपेक्षा आहे. या भरतीमुळे राज्यातील पोलीस दलातील रिक्त पदे भरली जातील आणि सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होईल.
शासन निर्णयात भरतीची प्रक्रिया, पात्रता, रिक्त पदांची माहिती व अर्ज कसा करायचा यासंबंधी सर्व सूचना स्पष्टपणे दिल्या आहेत.
त्यामुळे पोलीस भरतीसाठी मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून, उमेदवारांनी अर्ज करण्याची तयारी करणे महत्त्वाचे आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/state-2/