बुलढाणा जिल्ह्यात १५ हजार हेक्टर पिकांची नासाडी

जिल्ह्यात १९ हजार शेतकऱ्यांवर अस्मानीचा फटका

परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी

धुमाकूळ घातला. यामध्ये १९ हजार शेतकऱ्यांना फटका बसला

Related News

आहे. शिवणी आरमाळ शिवारात सोयाबीनच्या गंजीवर वीज

कोसळली. यात सोयाबीन जळून खाक झाल्याने अंढेरा येथील

शेतकऱ्याचे नुकसान झाले. सोयाबीन, पावसाने फळपिकांची

मुसळधार नासाडी झाली. जिल्ह्यात या आठवड्यात चिखली,

खामगाव व मेहकर तालुक्यामध्ये अतिवृष्टी व वादळी पावसाने

१८ हजार ९२४ शेतकऱ्यांचे १५ हजार २३३ हेक्टर क्षेत्रावरील

पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे कपाशी, सोयाबीन,

भाजीपाला व मका पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरी

मेटाकुटीस आला आहे. १८ व १९ ऑक्टोबरला चिखली

तालुक्यातील ११ गावे, खामगाव ५५ गावे, मेहकरमध्ये ६ अशा

७२ गावांना अतिवृष्टी व वादळी पावसाचा तडाखा बसला. या

गावांमधील १८ हजार ९२४ शेतकऱ्यांच्या पिकांची अतिवृष्टी व

वादळाने हानी झाली. या तीन तालुक्यांमध्ये १५ हजार २३३.७०

हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. चिखली तालुक्यात २४२

शेतकऱ्यांच्या ६९.७० हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली.

खामगाव तालुक्यात १८ हजार २३७ शेतकऱ्यांचे १४ हजार ८९६

हेक्टर क्षेतावरील सोयाबीन, कपाशी, मका, व भाजीपाला पिकांचे

नुकसान झाले. मेहकर तालुक्यात ४४५ शेतकऱ्यांच्या मालकीच्या

२६८ हेक्टरवरील कपाशी व सोयाबीनचीहानी झाली. दसरा

अंधारात गेला, आता दिवाळीचा सणही काळोखातच जाणार

आहे. यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. वेचणीला

आलेले पांढरे सोने काळवंडले आहे. सरकी फुगून वाती तयार

झाल्या आहेत. त्याला कोंब फुटले आहे. अंढेरा मंडळातील पाडळी

शिंदे, मेंडगाव, सावखेड नागरे, बायगाव बुद्रुक, शिवणी आरमाळ,

सेवानगर, अंढेरा या गावांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

आहे. शासनाने तातडीने सर्वे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी

मागणी होत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/union-bank-of-india-fined-rs-54-lakh-by-financial-intelligence-system/

Related News