15 ऑक्टोबर ; आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन

ग्रामीण भागातील महिलांच्या योगदानाचे महत्त्व पटवून देणारा दिवस

आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन दरवर्षी 15 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. हा दिवस ग्रामीण भागातील  15 ऑक्टोबर  म्हणून साजरा केला जातो. विशेषतः शेती, अन्न सुरक्षा, कुटुंबाचे पालनपोषण आणि ग्रामीण विकासात या महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. ग्रामीण महिलांवर कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक जबाबदाऱ्या असतात. त्या शेती, पशुपालन, वनसंपदा व्यवस्थापन, व शेतमजुरी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

भारतासारख्या कृषिप्रधान देशात ग्रामीण महिला शेतीत कष्ट करत असतात, तरीदेखील त्यांचे कार्य अनेकदा दुर्लक्षित राहते. या महिलांचे आरोग्य, शिक्षण, आणि आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष चर्चा आणि कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात. 2007 साली संयुक्त राष्ट्राने या दिवसाची सुरुवात केली. या दिवशी ग्रामीण भागातील महिलांच्या हक्कांची आणि समस्यांची दखल घेण्यात येते. आजही अनेक ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात आणि त्यांना शिक्षण व आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागते.या ग्रामीण महिलांना प्रगतीच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी विविध योजना आणि धोरणे या दिवशी राबवल्या जातात. आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाच्या निमित्ताने अनेक देशांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांना चालना दिली जाते. महिलांना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जातात.

भारतातील महिला सक्षमीकरण योजना

Related News

आपल्या भारतात देखील ग्रामीण महिलांच्या विकासासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी काही योजना राबवल्या जातात. जसे की, भारतात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जनधन योजना, तसेच महिला शेतकरी सक्षमीकरण योजना अशा विविध सरकारी उपक्रमांनी ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण महिलांच्या कष्टांना मान्यता देऊन, त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी शासन आणि समाज या दोघांची भूमिका महत्त्वाची असते. ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग वाढवून, त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन हा त्यांचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्यासाठी अधिक चांगले भविष्य घडवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 थीम 

या वर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाचा उद्देश हा ग्रामीण महिलांच्या सशक्तिकरणासाठी ,गुंतवणुक करणे आणि त्यांच्या समानता, लवचिकता, आणि टिकाऊ भविष्यासाठी कार्य करणे हा आहे. तसेच स्त्री-पुरुष समानता साध्य करण्यासाठी आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे कल्याण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित करते.

आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन इतिहास 

आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाची स्थापना 15 ऑक्टोबर 2007 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने केली. या दिवसाचा उद्देश ग्रामीण महिलांच्या योगदानाचे महत्त्व आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधणे आहे. 1995 मध्ये बीजिंगच्या चौथ्या महिला जागतिक परिषदेतील चर्चेनंतर ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची आवश्यकता अधोरेखित झाली. हा दिवस जागतिक स्तरावर जागरूकता वाढवण्यासाठी आणि ग्रामीण महिलांना सामाजिक, आर्थिक, आणि शैक्षणिक साक्षरतेच्या दृष्टीने सशक्त करण्यासाठी साजरा केला जातो. ग्रामीण महिलांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि धोरणांची आवश्यकता आहे.

Related News