न्यूयॉर्क हेलिकॉप्टर दुर्घटना: हडसन नदीत कोसळून सहा जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश

न्यूयॉर्क हेलिकॉप्टर दुर्घटना: हडसन नदीत कोसळून सहा जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश

न्यूयॉर्क हेलिकॉप्टर दुर्घटना: हडसन नदीत कोसळून सहा जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश

न्यूयॉर्क (अमेरिका): न्यूयॉर्कच्या हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये स्पेनमधील एकाच कुटुंबातील पाच सदस्य आणि हेलिकॉप्टरचा पायलट यांचा समावेश आहे. मृतांपैकी तीन लहान मुले आहेत.

ही दुर्घटना गुरुवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार 3:17 वाजता घडली. न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी या घटनेबद्दल

Related News

माहिती देताना मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. “मृतांचे नातलग आणि मित्र परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे त्यांनी सांगितले.

मृतांमध्ये स्पेनमधील सीमेन्स मोबिलिटीचे सीईओ आणि कुटुंब

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर ‘न्यूयॉर्क हेलिकॉप्टर्स’ या कंपनीचे होते आणि ते पर्यटकांना न्यूयॉर्क सिटीचे विहंगम दृश्य

दाखवण्यासाठी वापरले जात होते. मृतांमध्ये सीमेन्स मोबिलिटी कंपनीचे सीईओ ऑगस्टिन, त्यांची पत्नी, आणि तीन मुले आहेत. हा संपूर्ण कुटुंब न्यूयॉर्क भेटीसाठी आलेला होता.

बचावकार्य तत्काळ सुरू

न्यूयॉर्कचे अग्निशमन आयुक्त रॉबर्ट टकर यांनी सांगितले की दुर्घटनेची पहिली सूचना मिळताच बचाव नौका आणि पथक तात्काळ

घटनास्थळी रवाना झाले. चौघांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. उर्वरित दोघांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुर्घटना मॅनहॅटनच्या पश्चिम बाजूला, हडसन नदीकिनाऱ्यावरील फॅशनेबल दुकाने, हॉटेल्स आणि न्यूयॉर्क विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसजवळ घडली.

पूर्वीच्या दुर्घटनांची आठवण

न्यूयॉर्क शहरात याआधीही अशा हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्या आहेत:

  • 2018: ईस्ट रिव्हरमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात पाच प्रवाशांचा मृत्यू, फक्त पायलट वाचला.

  • 2009: हडसन नदीवर इटालियन पर्यटकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर एका खाजगी विमानाला धडकले होते. यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

चौकशी सुरू

या दुर्घटनेच्या चौकशीसाठी FAA (Federal Aviation Administration) आणि NTSB (National Transportation Safety Board)

यांनी तपास सुरू केला आहे. हेलिकॉप्टर का कोसळले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही

More update here

https://ajinkyabharat.com/santo-domingo-night-club-accident-circle-kosun-79-cancer-death/

Related News