“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट

"१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही", गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट

पुण्यात गर्भवती महिलेचा पैशाअभावी दुर्दैवी मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप

पुणे: शहरातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर एका गर्भवती महिलेला वेळीच उपचार न दिल्याने

तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार अमित घोडके यांनी केला आहे.

त्यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (वय २९) यांना २९ मार्च रोजी रक्तस्त्रावाच्या

Related News

तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तनिषा या सातव्या महिन्यात गर्भवती होत्या.

रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी २० लाख रुपयांचा अंदाज कुटुंबियांना दिला आणि तत्काळ १० लाख

भरल्याशिवाय उपचार सुरु न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने अडीच लाख रुपये तत्काळ देण्याची तयारी दर्शवली,

मात्र रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे भिसे कुटुंबीयांनी तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.

वाकड येथील रुग्णालयात त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र रक्तस्राव वाढल्याने तनिषा यांचा मृत्यू झाला.

भाजप आमदार अमित घोडके यांनी ही बाब विधान परिषदेत मांडण्याचा इशारा दिला असून,

आरोग्य व्यवस्थेचं हे अपयश लाजिरवाणं आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तर, या घटनेनंतर विरोधी पक्षनेते संजय राऊत यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

सध्या पोलिसांनी तपास सुरू केला असून,

रुग्णालयातील CCTV फुटेज, संबंधित डॉक्टर आणि नर्सेसचे जबाब घेतले जात आहेत.

अहवाल आरोग्य विभागाकडे सादर केला जाणार आहे.

Related News